Pune Bridge Collapse : ...तरी पर्यटकांनी ऐकलं नाही; मावळच्या कुंडमळा दुर्घटनेवर पुण्याचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?

Pune Bridge Collapse update : मावळ दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर प्रशासनावर टीका होत आहे. तसेच या प्रकरणावर आता पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maval Bridge Collapses
Maval Bridge CollapsesSaam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा दुर्घटनेत ४ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून ही दुर्घटना घडली. तर प्रशासनाकडून नदीत वाहून गेलेल्या तिघांचा अद्याप शोध सुरु आहे. पूल कोसळल्यानंतर अनेकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बळी गेल्याचा आरोप केला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भाष्य केलं आहे.

मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पूल कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. काही वेळाने एनडीआरएफचं पथकही घटनास्थळी पोहोचलं. काही जण पुलामध्येही अडकले होते. त्यांनाही वाचवण्यात यश आलं. या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेवर बोलताना पुण्याचे जिल्हाधिकारी जिंतेंद्र डुडी म्हणाले, 'दुर्घटनेची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. यासाठी एक कमिटी नेमण्यात येईल. अशा घटना पुढे घडणार नाहीत. या संदर्भात एक पथक तयार करण्यात येईल'.

Maval Bridge Collapses
Maval Kundmala Tragedy : मोठी बातमी! पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २० ते २५ जण पर्यटक वाहून गेल्याची भीती

'आमच्या आदेशानंतरही पर्यटक ऐकत नाही. कुंडमळा या ठिकाणी दोन कर्मचारी होते. त्यांनी लोकांना जाऊ नका आवाहन केलं होतं. तरी पर्यटकांनी ऐकलं नाही. यापूर्वी आम्ही आदेश काढलेले आहेत. यापुढे पर्यटनासंदर्भात एसओपी तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जे लोक पर्यटनासाठी आलेले होते. ते घरी आले नाहीत किंवा संपर्क झाला नाही, अशा लोकांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

Maval Bridge Collapses
Maharashtra Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस; रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट, VIDEO

रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु

दरम्यान, कुंडमळा येथील आजूबाजूंच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल कोसळला. ही दुर्घटना साडे तीन वाजण्याच्या सुमारास पूल कोसळला. पूलाच्या ठिकाणी अंदाजे १०० पर्यटक आले होते. या दुर्घटनेतील ३८ जणांचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी १८ व्यक्ती जखमी झाले. दुर्घटनेतील जखमींना पवना रुग्णालय, मायमर रुग्णालय, अर्थव रुग्णालयात दाखल केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com