Maval Kundmala Tragedy : मोठी बातमी! पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; २० ते २५ जण पर्यटक वाहून गेल्याची भीती

Maval Tragedy update : मावळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मावळच्या इंद्रायणी नदीचा पूल कोसळला आहे. यात २० ते २५ जण पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
pune News
pune Saam tv
Published On

पुण्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरल पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २० ते २५ पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पुण्यातील मावळ तालुक्यात हा धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

pune News
Wife Killed Husband : नाशिक हादरलं! बायकोने नवऱ्याचे तुकडे तुकडे केले; गोणीत भरून शोषखड्ड्यात फेकला

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. आज रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती. या गर्दीमुळे पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

pune News
Corona Update : कोरोनाचा पुन्हा उद्रेक? आरोग्य यंत्रणेची धाकधूक वाढली, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणाकडून सुरु आहे.

pune News
Pune Crime : पुण्यातील पोलिस निरीक्षकाचा कारनामा उघड; कोट्यवधीची जमीन बळकावली, काय आहे प्रकरण? वाचा

दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. नदीत बुडालेल्या पर्यटकांची शोधाशोध सुरु करण्यात आली आहे. काही स्थानिकांनी नदीत बुडालेल्या काही पर्यटकांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर पर्यटकांची मोठी संख्या नदी किनारी पाहायला मिळत आहे.

खासदार सुप्रिया सुळेंचं पर्यटकांना मोठं आवाहन

खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरिक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com