Raja Raghuvanshi: 'टेन्शन घेऊ नको सगळं वेळेत होईल, मग आपण...', राजा रघुवंशीचा काटा काढण्याआधी सोनम- राजमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

Raja Raghuvanshi Case: राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणातील आरोपी त्याची बायको सोनम आणि राज कुशवाह यांचे व्हॉट्सअप मेसेज समोर आले आहेत. यामध्ये दोघंही राजाच्या हत्येबद्दल बोलताना दिसून आले.
Raja Raghuvanshi: 'टेन्शन घेऊ नको सगळं वेळेत होईल, मग आपण...', राजा रघुवंशीचा काटा काढण्याआधी सोनम- राजमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Raja Raghuvanshi CaseSaam Tv
Published On

इंदुरचा राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात राजाची बायको सोनम आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसह ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर राजाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला जात आहे. शिलाँग पोलिसांनी सांगितलेकी की, राज कुशवाह हा या हत्याकांडाचा सूत्रधार आहे आणि सोनम त्यात त्याची साथीदार आहे. राजाची हत्या करण्यापूर्वी या दोघांमध्ये नेमकं काय काय बोलणं झालं होतं याची माहिती समोर आली आहे.

शिलाँग पोलिसांनी क्राइम सीन रीक्रिएट केला तेव्हा सोनम आणि मारेकऱ्यांनी अवघ्या १८ मिनिटांत ही हत्या केल्याचे उघड झाले. यासोबतच शिलाँग पोलिसांना सोनम आणि राज यांच्या जुन्या गप्पा आणि रेकॉर्डिंग्जही सापडल्या आहेत. ज्यामध्ये सोनमचा आवाज आहे. या रेकॉर्डिंगवरून राज आणि सोनमचे हेतू स्पष्टपणे दिसून येतात. राजने मेसेजमध्ये लिहिले होते की, 'जर तो निघून गेला तर सर्व काही सोपे होईल.' सोनमने लिहिले होते की, 'आपण दोघे पुन्हा एकत्र राहू.' हा पुरावा न्यायालयासाठी महत्त्वाचा आहे. पोलिस तो आरोपपत्रात जोडणार आहेत.

Raja Raghuvanshi: 'टेन्शन घेऊ नको सगळं वेळेत होईल, मग आपण...', राजा रघुवंशीचा काटा काढण्याआधी सोनम- राजमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Raja Raghuvanshi Case: ...तरच मी तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवेन, सोनमने राजा रघुवंशीसमोर का ठेवली होती अट?

व्हायरल चॅटमध्ये राज म्हणतो, 'काळजी करू नकोस, सगळं वेळेवर होईल. सगळं काही ठीक आहे, फक्त त्याला घेऊन ये. मेघालयात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करेल. आणि जे काही करायचं आहे ते आम्हीही करू. तिथे कोणीही शंका घेणार नाही.' यावर सोनम उत्तर देते, 'मलाही तेच हवे आहे. एकदा हे सगळं झालं की आपण शांततेत जगू.' सोनम आणि राज यांचे चॅटिंग समोर आल्यानंतर राजाच्या कुटुंबाचे दुःख आणखी वाढले आहे. राजाचा भाऊ म्हणतो की आता संशयाला वाव नाही. हे रेकॉर्डिंग पोलिसांसाठी तपासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Raja Raghuvanshi: 'टेन्शन घेऊ नको सगळं वेळेत होईल, मग आपण...', राजा रघुवंशीचा काटा काढण्याआधी सोनम- राजमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Raja Raghuvanshi Case : माझ्या भावाचा मृतदेह कुजलेला, चेहरा सांगाड्यात बदलेला, शरीरावर किडे; राजा रघुवंशीच्या भावानं सांगितली आपबिती

शिलाँग पोलिसांच्या कोठडीत असलेले आरोपी राज कुशवाह, सोनम रघुवंशी, विशाल उर्फ ​​विक्की चौहान, आनंद कुर्मी, आकाश राजपूत यांच्या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी त्यांना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार करायला लावले तेव्हा त्यांनी राजाची हत्या दुपारी २ ते २:१८ वाजताच्या दरम्यान म्हणजेच अवघ्या १८ मिनिटांत केल्याचे उघड झाले. सोनम आणि राज यांनी हत्येसाठी कॉन्ट्रॅक्टर देण्यास नकार दिला आहे. राज म्हणतो की विशाल, आनंद आणि आकाश यांनी मैत्रीच्या नावाखाली त्याला पाठिंबा दिला.

Raja Raghuvanshi: 'टेन्शन घेऊ नको सगळं वेळेत होईल, मग आपण...', राजा रघुवंशीचा काटा काढण्याआधी सोनम- राजमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Raja Raghuvanshi Case : राजा रघुवंशीच्या हत्येपूर्वीचा ट्रेकिंगचा नवीन VIDEO समोर, सोनम पुढे तर राजा मागे अन्...

नुकताच एक ऑडिओ व्हायरल झाला आहे जो राज आणि सोनमचा असल्याचे सांगितले जात आहे. या ऑडिओमधील तिसरे नाव आनंद आहे, जो हत्येतील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. हत्येपूर्वी आनंदला संशय होता की तो पकडला जाऊ शकतो. यामुळे त्याने आधीच त्याचा फोन बंद केला होता. शिलाँग पोलिसांनी कॉल रेकॉर्डिंग प्ले करून राजची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की त्यांचा हेतू राजाला मारण्याचा नव्हता तर फक्त त्याला घाबरवण्याचा होता. जेव्हा पोलिसांनी राज कुशवाहाला विचारले की त्याने राजाला घाबरवण्यासाठी खड्ड्यात का टाकले, तेव्हा तो गप्प बसला. मग तो म्हणाला की सगळं अपघाताने घडलं.

Raja Raghuvanshi: 'टेन्शन घेऊ नको सगळं वेळेत होईल, मग आपण...', राजा रघुवंशीचा काटा काढण्याआधी सोनम- राजमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Raja Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमच्या दिराचा खळबळजनक आरोप, नेमकं काय म्हणाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com