Raja Raghuvanshi Case: ...तरच मी तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवेन, सोनमने राजा रघुवंशीसमोर का ठेवली होती अट?

Raja Raghuvanshi Killed Case: राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. चौकशीदरम्यान सोनमने धक्कादायक माहिती दिली. सोनमने राजासमोर शरीरसंबंध ठेवण्याबाबत एक अट ठेवली होती.
Raja Raghuvanshi Case: ...तरच मी तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवेन, सोनमने राजा रघुवंशीसमोर का ठेवली होती अट?
Raja Raghuvanshi CaseSaam TV News
Published On

इंदुरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या हत्याकांड प्रकरणात राजाची बायको सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाह यांच्यासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. आरोपींच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सोनम रघुवंशीने लग्नानंतर राजाला तिच्या जवळ येण्यापासून रोखले होते. तिने राजाला सांगितले होते की, ती कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर आणि पूजा केल्यानंतरच नवीन जीवन सुरू करेल आणि त्यानंतरच ती त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवेल. चौकशीदरम्यान सोनमने सांगितले की, 'राजाला मेघालयला जाण्यास भाग पाडण्यासाठी मी ही अट घातली होती.

राजा लग्नानंतर लगेच हनिमूनला जाण्यास तयार नव्हता. पण लग्नाआधीच सोनमने तिच बॉयफ्रेंड राजसोबत प्लान केला होता की एखाद्या निर्जन ठिकाणी नेऊन राजाची हत्या करायची. यासाठी सोनमने ईशान्येकडील ठिकाण हनिमूनसाठी निवडले. सोनमने राजाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आणि तिच्यासोबत येण्यासाठी तो भाग पडावा यासाठी सांगितले होते की, 'मी कामाख्या देवीच्या दर्शनानंतरच आपल्या जोडीदारासोबत नवीन आयुष्य सुरू करेल अशी प्रार्थना केली होती.' पोलिस चौकशीदरम्यान सोनमने कबुल केले की, तिने राजासमोर ही अट ठेवली होती जेणेकरून तो तिच्यासोबत जाण्यास तयार होईल.

Raja Raghuvanshi Case: ...तरच मी तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवेन, सोनमने राजा रघुवंशीसमोर का ठेवली होती अट?
Raja Raghuvanshi : मला हिंदी समजलं नाही, पण हावभाव समजले अन् केस फिरली; सोनमचं पितळ उघडं पाडणारा अल्बर्ट पीडी कोण?

११ मे रोजी सोनम आणि राजाचे लग्न झाले. त्यानंतर २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी इंदूरहून मेघालयला गेले. दोघेही सर्वात आधी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटी पोहोचले. गुवाहाटीमध्येच राजाला मारण्याची योजना होती. पण नंतर सोनमने ती पुढे ढकलली आणि शिलाँगमध्ये त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. यानंतर राजा आणि सोनम शिलाँगमध्ये आल्यानंतर त्यांच्यामागे मारेकरी देखील आले. सोनमने राजाला मारण्यासाठी या ३ शूटर्सला पैसे दिले होते. या तिघांनी सोनमसमोरच राजाची हत्या केली. त्यानंतर सोनम फरार झाली.

Raja Raghuvanshi Case: ...तरच मी तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवेन, सोनमने राजा रघुवंशीसमोर का ठेवली होती अट?
Raja Raghuvanshi : राजा रघुवंशी प्रकरणात आत्तापर्यंतचा मोठा खुलासा, पतीचा मृतदेह दरीत फेकण्यात सोनमचाही हात; त्यानंतर...

तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोनमने तीन मारेकऱ्यांसह राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह खड्ड्यात फेकून पळ काढला. त्यानंतर सोनम टॅक्सी, बस आणि ट्रेनमधून मार्ग बदलून इंदूरला पोहोचली. येथे ती राजाने भाड्याने घेतलेल्या घरात अनेक दिवस राहिली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी राजाची हत्या केलेल्या शूटर्सला अटक केल्यानंतर सोनम इंदूरहून यूपीतील गाजीपूरला गेली आणि तिच्या अपहरणाची बनावट कथा रचून तिथे आत्मसमर्पण केले.

Raja Raghuvanshi Case: ...तरच मी तुझ्यासोबत शरीरसंबंध ठेवेन, सोनमने राजा रघुवंशीसमोर का ठेवली होती अट?
Raja Raghuvanshi Case : बेवफा सोनम! लग्नाआधीच हत्येचा कट, अवघ्या १८ मिनिटात राजाला संपवलं; हत्याकांडाची थरारक कहाणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com