
इंदूर : मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेलं इंदूरचं जोडपं मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अचानक बेपत्ता झालं. त्यांच्या शोधासाठी दुर्गम भागांमध्ये पोलीस पथकं पाठवण्यात आली. शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. पण हाती काहीच लागलं नाही. पोलीस अंधारात चाचपड होते. तपासाला दिशा मिळत नव्हती. पोलिसांच्या हाती काहीच लागत नसताना एका स्थानिक आल्यानं तपासाला दिशा तर मिळालीच, सोबतच एका धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा झाला.
लग्नानंतर हनिमूनला गेल्यावर सोनम रघुवंशीनं तिचा पती राजाची हत्या केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांचे हात बरेच दिवस रिकामेच होते. अशा परिस्थितीत स्थानिक गाईड अल्बर्ट पी डी याची संपूर्ण प्रकरणात एन्ट्री घेतली. हत्याकांडाची उकल करण्यात अल्बर्टनं महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या जबाबामुळेच आज राजाचे मारेमरी गजाआड गेले आहेत. २२ मे रोजी सोनम आणि राजाला तीन पुरुषांसोबत पाहिलं होतं. ते नोंग्रियाटहून मावलखियाटकडे ३ हजारांहून अधिक पायऱ्या चढत जात होते, अशी माहिती गाईड असलेल्या अल्बर्ट यांनी पोलिसांना दिली.
'राजासोबत चार पुरुष पुढे चालत होते आणि सोनम त्यांच्या मागून चालत होती. ते सगळे हिंदीत बोलत होते. मला हिंदी नीट समजत नाही. पण त्यावेळी त्यांच्यात सुरु असलेलं संभाषण पाहता सगळं आलबेल नव्हतं. त्यामुळे मी याबद्दल पोलिसांना अलर्ट केलं,' अशी माहिती अल्बर्टनं दिली.
सोनमने राजाला संपवण्यासाठी तिघांना २० लाख रुपये दिले होते. नोंग्रियाटहून मावलखियाटकडे जात असताना सोनमने भावानसाई नावाच्या दुसऱ्या गाईडची सेवा घेतली. त्यामुळे अल्बर्ट सोनम आणि राजासोबत पुढे जाऊ शकला नाही. भावानसाईने सोनम आणि राजाला शिपारा होमस्टेपर्यंत सोडलं. तिथून तो परतला. मेघालय पोलिसांनी या केसला 'ऑपरेशन हनिमून' असं नाव दिलं होतं. या तपासात १२० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.