Sonam Raghuvanshi : सोनम प्रकरणात 'मिस्ट्री मॅन' जितेंद्र रघुवंशीची एन्ट्री, खात्यातून लाखोंचे व्यवहार; राज कुशवाह सांभाळत होता अकाउंट्स
इंदूर : राजा रघुवंशी हत्याकांडात एक नवीन वळण आलं आहे. पोलिसांनी देवास येथील जितेंद्र रघुवंशी याचं नाव शोधून काढलं आहे. सोनम रघुवंशीचा प्रियकर राज कुशवाह हवाला व्यवसाय करत असल्याचा आरोप आहे. पोलिसांना राज कुशवाहाचे चार बँक खाते सापडले आहेत. या खात्यांमध्ये लाखो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. ही सर्व खाती जितेंद्र रघुवंशी यांच्या नावावर आहेत. पोलीस आता जितेंद्र रघुवंशीचा शोध घेत आहेत. दरम्यान, इंदूर पोलिसांनी या नावाची पुष्टी केलेली नाहीय. सोनमने राज कुशवाहमार्फत हवालाद्वारे पैसे पाठवले असल्याचा पोलिसांना संशय आहे. जितेंद्र रघुवंशी याची चौकशी करून पोलिसांना या प्रकरणातील सत्य जाणून घ्यायचं आहे.
पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत . तपासात असं दिसून आलं आहे की, राज कुशवाह सोनम रघुवंशीचा व्यवसाय पाहत असे. तो पैशांचे व्यवहारही करत असे. राज कुशवाहने त्याच्या सहकाऱ्यांना ५०,००० रुपये दिले होते असा पोलिसांना संशय आहे. सोनमने या पैशांची व्यवस्था केली होती. त्यानंतर राजचे सहकारी ट्रेनने शिलाँगला गेले.
जितेंद्र हा सोनमचा चुलत भाऊ आहे
त्याचवेळी, सोनमचा भाऊ गोविंद म्हणाला आहे की जितेंद्र रघुवंशी हा माझा चुलत भाऊ आहे. तो माझ्या मावशीचा मुलगा आहे. आम्ही त्याचे खाते वापरायचो. तो एक अशिक्षित व्यक्ती आहे. तो माझ्या गोदामात काम करायचा. तो कोणत्याही हवाला व्यवसायात सहभागी नाही.
पोलीस आता जितेंद्र रघुवंशी याचा शोध घेत आहेत
पोलीस आता जितेंद्र रघुवंशी यांची चौकशी करतील. या प्रकरणात जितेंद्र रघुवंशी अनेक महत्त्वाचे खुलासे करू शकतील अशी पोलिसांना आशा आहे. तो राज कुशवाह आणि सोनमशी त्याचे काय संबंध आहे हे सांगू शकेल. सोनमने राज कुशवाहमार्फत हवालाद्वारे लाखो रुपये पाठवले होते, असाही पोलिसांना संशय आहे.
कुटुंब हवाला व्यवसायात सहभागी असू शकतं
राजा रघुवंशी यांचे भाऊ सचिन रघुवंशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सोनम आणि तिचे कुटुंब हवाला व्यवसायात सहभागी असू शकत. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की सोनमच्या कुटुंबाकडे इतके पैसे कुठून आले. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सोनमचा नातेवाईक देवासमध्ये राहतो
राजा रघुवंशीच्या आईनेही माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, सोनमचा एक नातेवाईक देवासमध्ये राहतो. सोनम तिच्या लग्नापूर्वी देवासमध्ये तिच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती. तिने राजाला तिच्यासोबत येण्यास सांगितलं होतं. पण राजाने नकार दिला होता. राजाने म्हटलं होतं की, जेव्हा त्याला आमंत्रण मिळालं नाही तेव्हा तो कसा जाऊ शकतो. तो जितेंद्र रघुवंशी असू शकतो, असा संशय राजाच्या आईने व्यक्त केलाय.
ती राज कुशवाह मार्फत हवाला व्यवसाय करत होती का?
या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोनम राज कुशवाह मार्फत हवाला व्यवसाय करत होती का? सोनमने दुसरीकडे कुठेतरी पैसे पाठवण्यासाठी हवालाचा वापर केला होता का? सोनम हवालाद्वारे दुसरीकडे कुठेतरी पैसे पाठवणार होती का? आणि नंतर राजसोबत तिथे शिफ्ट होणार होती का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
इंदूर पोलिसांकडे कोणतीही माहिती नाही
गुन्हे शाखेचे अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोटिया म्हणाले की, आमच्याकडे अशी कोणतीही माहिती नाही. संपूर्ण प्रकरणाचा तपास मेघालय पोलिसांकडून केला जात आहे. जर त्यांनी आम्हाला तपासात मदत मागितली तर आम्ही त्यांना मदत करत आहोत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.