LOVER COUPLE SUICIDE IN BANDA: FAMILY OPPOSITION TO MARRIAGE ENDS IN TRAGEDY saam tv
देश विदेश

एकत्र जगता आलं नाही तर...; लग्नाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेमीयुगुलाचा टोकाचा निर्णय

Lover Couple End Life Due To Family Opposition In Banda Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात प्रेमीयुगुलाने लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस तपास सुरू असून गावात शोककळा पसरली आहे.

Omkar Sonawane

उत्तरप्रदेशमधील बांदा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामासिन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मुलाचे आणि मुलीचे मृतदेह एकत्र आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये गेल्या वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि त्यांना एकमेकांशी लग्न करायचे होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. दोघेही सतत एकमेकांच्या संपर्कात होते. ते दोघेही एकाच जातीचे असल्याचे ही सांगितले जात आहे. मुलीच्या नातेवाईकांच्या म्हणण्यांनुसार मुलाच्या कुटुंबाला हा संबंध मान्य नव्हता. लग्नात येणाऱ्या अडथळ्यांमुळे दोघे मानसिक तणावात होते. त्यामुळे दोघांनी एकत्र राहता येत नसेल तर एकत्र आपण जीवन संपवू असा धक्कादायक निर्णय दोघांनी घेतला. दोघांनी विषारी पदार्थांचे सेवन केले आणि जीवनयात्रा संपवली.

गावाबाहेर दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबांमध्ये एकच टाहो फोडला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा येथील राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहेत.

या प्रकरणाबाबत माहिती देताना उपअधीक्षक कृष्णकांत त्रिपाठी यांनी सांगितले की, कमासिन परिसरात एका प्रेमी युगलाने विषारी पदार्थ सेवन केल्याची माहिती मिळाली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दोघेही बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

एक वर्ष चाललेल्या या प्रेमकथेचा शेवट अत्यंत दुर्दैवी पद्धतीने झाला आहे. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT