Crime news: ऑफिसची पार्टी संपली, पती न्यायला आला अन्...! लग्नाच्या २ महिन्यातच नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

Newly married woman: दक्षिण दिल्लीतील लोधी कॉलनी परिसरात नवविवाहित महिलेचा इमारतीतून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हुंडाबळीचा आरोप, पती अटक आणि पोलीस तपास सुरू असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
Newly married woman
Newly married womanSAAM TV
Published On

दक्षिण दिल्लीतील लोधी कॉलनी परिसरात एनडीएमसीच्या एका निवासी इमारतीतून पडून २८ वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली असून काही तासांपूर्वीच तिने तिच्या ऑफिसमध्ये लग्नानंतरच्या पार्टीचा आनंद साजरा केला होता. आकृती असं या महिलेचं नाव असून तिचं लग्न २४ एप्रिल रोजी झालं होतं. ती चत्तरपूरमधील एका हेल्थकेअर कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती.

आक्रृतीने शनिवारी तिने आपल्या ऑफिसमध्ये मित्रांसाठी पार्टी आयोजित केली होती. पार्टी संपल्यानंतर तिचा पती तिला घ्यायला ऑफिसमध्ये आला आणि दोघेही तेथून निघाले. साधारण सायंकाळी ७ वाजता तिने आपल्या आईला फोन करून ती घरी निघाली असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर रात्री सुमारे ८ वाजता लोधी कॉलनी पोलिसांना माहिती मिळाली की, एनडीएमसीच्या पालिका कुंज इथल्या निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून एक महिला खाली पडून गंभीर जखमी झालीये. पोलिसांनी तिला तात्काळ एम्स रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

Newly married woman
जन्मदात्या बापानेच अल्पवयीन मुलींच्या शरीराचे लचके तोडले; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकृती आपल्या पती आणि सासऱ्यासोबत पुष्प विहारमध्ये राहत होती. तिचा पती सध्या बेरोजगार आहे तर सासरे दिल्ली सरकारच्या कामगार विभागात निरीक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

मृत्यू लग्नानंतरच्या सात वर्षांच्या आत घडल्याने पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू करत उपविभागीय दंडाधिकारी (SDM) यांना याबाबत माहिती दिलीये. त्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केलीये. पोलिसांनी घटनेच्या सर्व बाजू तपासण्यास सुरुवात केली असून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातायत.

हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा आरोप

दुसरीकडे, पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही घटना आत्महत्येची असू शकते कारण अद्याप कोणताही ठोस घातपाताचा पुरावा समोर आलेला नाही. मात्र, आकृतीच्या कुटुंबीयांनी या दाव्याला स्पष्ट नकार दिलाय. त्यांचा आरोप आहे की लग्नानंतर तिला सतत हुंड्यासाठी छळ आणि मारहाण केली जात होती. तिचा भाऊ अमय सुतार याने सांगितले की वरपक्षाने सुरुवातीला हुंडा नाकारला होता, तरीही लग्नात कुटुंबाने सोनं दिलं होतं. लग्नानंतर काही दिवसांतच पतीकडून पैशांची आणि गाडीची मागणी सुरू झाली आणि मारहाणही केली जात होती, असा त्यांचा आरोप आहे.

Newly married woman
Crime: १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करत मृतदेह तलावात फेकला

कुटुंबीयांचे म्हणणं आहे की, आकृती वारंवार आईला फोन करून आपल्याला मारहाण आणि मानसिक छळ होत असल्याची माहिती देत होती. तिच्या काकांनीही सांगितलं की, दोघांमध्ये शाळेपासून ओळख होती आणि त्यांचे प्रेमविवाह झालं होतं. मात्र नंतर हुंड्याच्या मागण्या आणि पतीच्या बेरोजगारीवरून सतत वाद होत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Newly married woman
Shocking : भयंकर! पत्नीने पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, रूमचा दरवाजा बंद केला अन्...

कुटुंबाने या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे. ज्या एनडीएमसी इमारतीत तिचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी ती राहत नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे घटनास्थळी फक्त तिचा मोबाईल, चप्पल आणि हँडबॅग आढळली असून कोणतेही रक्ताचे डाग किंवा बाहेरील जखमा दिसून आल्या नाहीत, त्यामुळे हा घातपात असू शकतो असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि प्रत्येक बाजूने घटनेची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com