

करवीर तालुक्यातील उचगाव येथे गंभीर स्वरूपाचे प्रकरण उघडकीस आले.
आरोपीवर आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर कथित लैंगिक अत्याचार
गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
रणजीत माजगावकर, साम प्रतिनिधी
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील उचगाव येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पीडित मुलींची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून नागरिकांनीही त्यांच्या ओळखीचा उलगडा होईल अशी कोणतीही माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पीडित मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने नोव्हेंबर २०२५ पासून दोन्ही अल्पवयीन मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची कुणाकडेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. पीडित मुलींना संरक्षण देण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. आरोपीविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार नेमके किती काळ सुरू होते आणि या प्रकरणातील इतर बाबींचा तपास गांधीनगर पोलीस करत आहेत. या अमानुष घटनेमुळे उचगाव परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.