आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

Shocking Crime: एका तरुणाने आपल्या वहिनीची दगडाने ठेचून हत्या केली आणि त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेने मध्य प्रदेशातील रायसेन शहरात खळबळ उडाली आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On
Summary
  • रायसेन जिल्ह्यात दुहेरी मृत्यूची धक्कादायक घटना उघडकीस आली.

  • एका महिलेची दगडाने ठेचून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • मृत महिला ही तरुणाची वहिनी असल्याची प्राथमिक माहिती

मध्य प्रदेशातील रायसेन गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. गैरतगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात एक महिला आणि एका तरुणाचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, महिला आत्महत्या केलेल्या तरुणाची वहिनी होती. दिरानेच आपल्या वहिनीचं डोकं दगडाने ठेचलं, त्यानंतर गळफास घेऊन त्याने आपलं जीवन संपवलं असं सांगितलं जातंय.

Crime News
Crime News: १४ वर्षीय मुलीवर बलात्कार, वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने ज्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याच झाडाच्या फांदीला गळफास घेऊन त्याच्या धाकट्या भावाने आत्महत्या केली होती.

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव मुन्नू अहिरवार आणि वहिनीचे नाव सुनीता अहिरवार असं आहे. या घटनेप्रकरणी माहिती देताना गैरतगंज येथील पोलीस अधिकारी डीपी लोहिया म्हणाले की, गुरुवारी मुन्नू अहिरवार आणि त्यांची वहिनी दुचाकीवर बसून शेतात गेले होते. त्यावेळी रात्री शेतातून परतताना त्याने वहिनी सुनिता अहिरवार यांच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला.

Crime News
Crime News : धक्कादायक! व्यसन न करण्याच्या सल्ल्यावरून भडकला; संतापलेल्या १५ वर्षीय मुलानं क्रूरपणे जीव घेतला

डोक्याला बेदम मार लागल्याने सुनिता अहिरवार या जागीच मृत पावल्या. त्यानंतर मुन्नू हा तेथे पळून गेला. दरम्यान गावातील लोकांना सुनिता अहिरवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. मग स्थानिकांनी आणि नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मुन्नू याचा शोध सुरू केला. त्यावेळी त्याना मुन्नूचा मृतदेह एका झाडाला लटकलेला सापडला.

वहिनीच्या हत्येनंतर दीराने केली आत्महत्या

याप्रकरणी माहिती देताना नातेवाईक म्हणाले की, रात्री उशिरापर्यंत सुनिता आणि मुन्नू घरी आले नाहीत, तेव्हा त्यांना फोन केला. मात्र त्यांचा मोबाईल बंद जात होता. त्यांच्याशी कोणताच संपर्क झाला नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना सुनिता अहिरवार यांचा मृतदेह सापडला. याची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलीस मुन्नूचा शोध घेऊ लागले. तेव्हा मून्नूचा मृतदेह शुक्रवारी सकाळी काशीराम यांच्या शेतातील एका झाडाला लटकलेला दिसला. पोलिसांनी दोघांचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी रुग्णलायात पाठवला आहे.

चार वर्षापूर्वी धाकट्या भावाने केली आत्महत्या

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या हत्या आणि आत्महत्येमागची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जातोय. प्राथमिक तपासातून अशीही माहिती समोर आली की, ज्या झाडावर मुन्नूचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, त्याच झाडावर त्याच्या धाकट्या भावानेही चार वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलीस या बाबीचाही तपासात समावेश करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणाबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com