

गुजरातमध्ये १४ वर्षीय मुलीवर बलात्कार
पीडित मुलीच्या वर्गमैत्रिणीच्या वडिलांचं भयंकर कृत्य
घरी बोलावून २ वेळा केलं भयंकर कृत्य
पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला
गुजरातमध्ये १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. वर्गमैत्रिणीच्या वडिलांनी हे भयंकर कृत्य केले. मुलीचे अपरहण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपीने मुलीशी संपर्क वाढवण्यासाठी तिला मोबाईल गिफ्ट दिला होता. पीडित मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमीष दाखवत तिचे अपरहण केले होते. या प्रकरणी कापोद्रा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीमध्ये शिकणारी पीडित मुलगी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहते. तिची वर्गमैत्रिण चौथ्या मजल्यावर राहते. या दोन्ही मुली इन्स्टाग्रामवर वारंवार संवाद साधत होती. पीडित मुलगी तिच्या आईचा फोन वापरत असल्यामुळे आणि तिची वर्गमैत्रिण तिच्या वडिलांचे इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होती. यामुळे आरोपीला पीडित मुलीशी संपर्क साधण्यात यश आले.
हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा मुलीच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात आले की अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मैत्रिणीने वडील यांच्यात चुकीचे बोलणे सुरू आहे. त्यानंतर तिने वडिलांना याबाबत सांगितले. ज्यानंतर त्यांनी पीडित मुलीच्या हातात मोबाइल देणं बंद केले. ७ जुलैला पीडित मुलीच्या बहिणीला तिच्या जवळ एक मोबाइल फोन दिसून आला. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने सांगितले की माझ्या वर्गमैत्रिणीच्या वडिलांनी फोन विकत घेऊन दिला. ते दोघे गेल्या ६ महिन्यांपासून व्हॉट्सअपवर गुपचूप गप्पा मारत होत्या.
आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले होते. घरामध्ये कुणी नसताना आरोपीने दोन वेळा पीडित मुलीवर बलात्कार केला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी कापोद्रा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. या घटनेमुळे गुजरात हादरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.