Shocking : भयंकर! २२ वर्षीय तरुणाने ८ वर्षाच्या मुलीला फसवून जंगलात नेलं बलात्कार केला अन्...

Aasam Crime News : आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Aasam Rape Case Crime News
Aasam Rape Case Crime News Saam Tv
Published On
Summary
  • आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात धक्कादायक घटना

  • ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली

  • या प्रकरणी २२ वर्षीय आरोपीला अटक

  • पुढील तपास सुरु

आसाममधील श्रीभूमी जिल्ह्यात एका आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली असून घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी बेपत्ता झाली होती. बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी आणि आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी तिचा शोध सुरू केला. शोधमोहीमेदरम्यान घराजवळील जंगलातील टेकडीच्या भागात मुलीचा मृतदेह आढळून आला. ही घटना समोर येताच परिसरात खळबळ उडाली.

Aasam Rape Case Crime News
IAS Transfers : प्रशासनात मोठा बदल! ८ बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुठे कोणाची होणार नियुक्ती? वाचा

श्रीभूमी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक त्रिनयन भुयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मुलीला खोट सांगून जंगलात नेले. जंगलात नेल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिने कोणाला घडलेली घटना सांगू नये म्हणून तिची हत्या करण्यात आली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचा शोध घेत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

Aasam Rape Case Crime News
Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

दरम्यान, स्थानिकांनी आरोप केले आहेत की, गुन्ह्याची माहिती मदनमोहन पॅट्रोल पोस्टमधील पोलिसांना तातडीने देण्यात आली होती. मात्र, घटनास्थळापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर असलेल्या या चौकीतील पोलिसांनी तातडीने तक्रार नोंदवली नाही. यामुळे संतप्त नागरिकांनी चारगोला-हैलाकांडी जोडरस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले आणि आरोपीविरोधात कठोर कारवाई तसेच पोलिसांच्या कथित निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा मुख्यालयातून मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मदनमोहन पॅट्रोल पोस्टचे प्रभारी मोहन लाल दास यांना पुढील आदेशापर्यंत पदावरून हटवण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com