Himachal Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! भरधाव कार दरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

Himachal Pradesh Accident: हिमाचल प्रदेशमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कार दरीत कोसळली. अपघातामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Priya More
  • हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात भीषण अपघात

  • भरधाव कार ५०० फूट खोल दरीत कोसळली

  • अपघातात ७ जणांचा मृत्यू

  • मृतांमधील ६ जण एकाच कुटुंबातील

  • मुंडन समारंभाहून परतताना ही दुर्दैवी घटना घडली

हिमाचल प्रदेशमध्ये भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांसह ७ जणांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यामध्ये भरधाव कार दरीत कोसळून हा अपघात झाला. या अपघातामध्ये ४ पुरूष आणि ३ महिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे पुखरी-मसरुंद रस्त्यावर मनी झिरोजवळ भरधाव कार अनियंत्रित होऊन ५०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा समावेश आहे. अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. हे सर्वजण मुंडन समारंभामध्ये सहभागी झाल्यानंतर घराकडे परत जात असताना ही घटना घडली.

या अपघातामध्ये चुन्नी लाल (६५ वर्षे), देवी लाल (६२ वर्षे), बबली देवी (४५ वर्षे), मोती राम (५० वर्षे), अनिता कुमारी (२० वर्षे), कुंता देवी (५३ वर्षे) आणि मनोहर लाल (३४ वर्षे) या सात जणांचा मृत्यू झाला. चुन्नीलाल, देवीलाल आणि मोतीराम हे सख्खे भाऊ होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. कार थेट दरीत कोसळली. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

कुठेड पंचायतीचा भाग असलेल्या महाल गावातील रहिवासी मुंडन सोहळ्याला हजेरी लावून घरी परतत असताना हा अपघात घडला. हे कुटुंब आणि गावकरी काकाडोथा गावात आयोजित एका धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहिले होते आणि रात्री उशिरा सोहळ्यावरून परतत असताना भीषण अपघात झाला. या घटनेमुळे महाल गाव आणि आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच वेळी ७ जणांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट्स करणं पडलं महागात; मुंबई उच्च न्यायालयाचा नेत्याला दणका!

Maharashtra Politics: सहा दिवसांत दोनदा भेटी, NDAत प्रवेशासाठी? विलिनीकरणामुळे NDA प्रवेशाचं घोडं अडलं?

'शेतकऱ्यांना त्रास झालेला चालेल, उद्योजकांना नको'; गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त विधान

Pune Police Crime: खाकीवर काळा डाग! पुणे पोलीस झाले दरोडेखोर; व्यावसायिकाचे 1 कोटी लुटण्याचं बिंग फुटलं

Fact Check: इन्स्टाग्राम बंद होणार? इन्स्टावरील बंदीमुळे फॉलोअर्सचं काय?

SCROLL FOR NEXT