Jamnagar Tragedy Saam gtv
देश विदेश

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Jamnagar Tragedy update : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकून तिघांचा मृत्यू झाला. तिघेही एकाच कुटुंबातील होते.

Vishal Gangurde

गणेश विसर्जन दरम्यान एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

प्रितेश रावल आणि त्यांचे दोन लहान मुले पाण्यात बुडाले

अग्निशामक दलाच्या पथकाकडून तातडीने शोधमोहीम

पालिकेकडून कृत्रिम तलावांचा वापर करण्याचं आवाहन

गुजरातच्या जामनगरमध्ये गणेशोत्सवादरम्यान रविवारी मोठी दुर्दैवी घटना घडली. गणेश मूर्तीचं विसर्जन करताना एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तिन्ही बाप लेकांचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, ऐन गणेशोत्सवात जामनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. प्रितेश रावल (३६) आणि त्यांची दोन मुले संजय (१६) आणि अंश (४) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिघे जण जामनगरच्या रामेश्वरनगर भागात राहायला होते.

नेमकं काय घडलं?

रविवारी दुपारी प्रितेश हे दोन मुलांसोबत गणेश मूर्तीचं विसर्जन करायला घराबाहेर गेले. तिघेही मूर्तीच्या विसर्जनासाठी खोल पाण्यात गेले. खोल पाण्यात गेल्याने तिघे बुडाले. तिघे जण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच जामनगर महापालिकेचं अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाण्यात तिघांचे मृतदेह आढळले.

तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. तिघांचा ऐन गणेशोत्सवात मृत्यू झाल्याने हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीय रडून बेहाल झाले आहेत.

जामननगर महापालिका हद्दीत एका कृत्रिम तलाव बांधण्यात आला होता. मात्र, तरीही काही लोकांकडून तलाव आणि नदीमध्ये विसर्जन करायला जातात. त्यामुळे दुर्घटना घडतात,असं पालिका प्रशासनाचं म्हणणं आहे.

तिघांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे पालिकेने कृत्रिम तलावाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. पालिका प्रशासनाने या दुर्घटना रोखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करणार असल्याचे म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

4 zodiac signs: बुधवारी व्यापार-शिक्षणात यश, अष्टमीला देवीची कृपा; जाणून घ्या लाभदायी 4 राशी

व्होटचोरीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक; विरोधकांकडून आयोगावर प्रश्नांची सरबत्ती , बैठकीत नेमकं काय घडलं?

Maharashtra Rain Alert : राज्यातील काही जिल्ह्यांना यल्लो अलर्ट, जाणून घ्या कुठे कसा पडणार पाऊस

Dombivli Crime : मुलीला एकटीला पाहून नियत फिरली, घरातच राहणाऱ्या नराधमाचे लज्जास्पद कृत्य, डोंबिवलीत संतापजनक घटना

Maharashtra Live News Update: पालघारमधील अनेक माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT