Jahangir Khan alias ‘Pushpa’ arrested by Bengal Police near the India-Nepal border in connection with election violence cases. saam tv
देश विदेश

मोठी बातमी! बड्या नेत्याला नेपाळ बॉर्डवर अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Jahangir Khan Arrested Near Nepal Border Bengal Violence Case Details: पश्चिम बंगालमधील निवडणूक हिंसाचार प्रकरणातील आरोपी जहांगीर खान उर्फ पुष्पाला नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

पश्चिम बंगालच्या निवडणुकीवेळी वादात सापडलेल्या जहांगीर खान उर्फ पुष्पाला अटक करण्यात आली आहे. बंगाल पोलिसांनी ही करवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला भारत-नेपाळ सीमेजवळ अटक केली. अलीकडेच कोलकत्ता हाय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. बंगाल निवडणुकीवेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला होता असा आरोप केला आहे.

जहांगीर खान हे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फाल्टा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार होते. निवडणुकीदरम्यान त्यांच्यावर हिंसाचार आणि दहशत निर्माण केल्याचा आरोप होता. तक्रारींनंतर या जागेसाठी फेरनिवडणूक घेण्यात आली आणि भाजपने विजय मिळवला. दरम्यान, जहांगीर खान यांनी आधीच आत्मसमर्पण केले होते. निवडणुकीतही ते चौथ्या क्रमांकावर राहिले होते. फाल्टा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर धमक्या देणे, खंडणी मागणे, हिंसाचार करणे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणे यासह सात गुन्हे दाखल करण्यात आले होते. निवडणुकीनंतर ते फरार झाले होते. अनेक दिवसांपासून पोलीस त्यांच्या शोधात होते.

जहांगीर खान एक शक्तिशाली नेता मानला जात होता. फाल्टा येथील त्याच्या वर्चस्वामुळे तो 'पुष्पा' म्हणून ओळखला जात असे. जहांगीर खानची दहशत संपूर्ण प्रदेशात पसरली होती. तो नेपाळमार्गे देशाबाहेर पळून जाण्याची योजना आखत असल्याची माहिती विशेष कृती दलाला (एसटीएफ) मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचला. अखेर आज त्याच्या नेपाळ सीमेजवळ मुसक्या आवळल्या. पोलिसांचे म्हणणे आहे की, जहांगीर खानची अटक हे एक मोठे यश असून, त्याच्या चौकशीतून राजकीय हिंसाचाराविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.जहांगीर खान हे अभिषेक बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असून या प्रकरणामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या धारूर तालुक्यातील हिंगणी येथील सरस्वती नदीला पूर

ओमराजे निंबाळकरांनी सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी का केली? धाराशीवमधील सभेत उद्धव ठाकरेंनी थेट पडद्यामागची गोष्टच सांगितली

Chanakya Niti: या 8 गोष्टी चुकूनही कोणालाही सांगू नका, अन्यथा होईल तुमचंच मोठे नुकसान

'तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Eiffel Tower Lightning: आयफेल टॉवरवर वीज कोसळली, थरारक VIDEO होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT