Political News : माजी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जोरदार धक्का, २ खासदारांचा तडकाफडकी राजीनामा

Mamata Banerjee Delhi TMC News : तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी पक्ष व खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या घडामोडीमुळे ममता बॅनर्जी आणि टीएमसीसमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.
SUKHENDU SEKHAR ROY RESIGNS FROM TMC, ALLEGES CORRUPTION; BIG SETBACK FOR MAMATA BANERJEE
SUKHENDU SEKHAR ROY RESIGNS FROM TMC, ALLEGES CORRUPTION; BIG SETBACK FOR MAMATA BANERJEESaam Tv
Published On
Summary
  • तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी राजीनामा दिला

  • त्यांनी खासदारकीसोबतच पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला

  • बंडखोरीमुळे टीएमसीसमोर मोठे राजकीय आव्हान

  • रॉय यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली

इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जी यांना दिल्लीतही मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसच्या दोन राज्यसभा खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. खासदार सुखेंदू शेखर रॉय आणि खासदार कोएल मल्लिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर रॉय यांनी खासदारकीसोबतच पक्षाचाही राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. दिल्लीतील राजकारणातील बदलावामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद सुरु होते. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर अनेक आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली. काही आमदारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचाही दावा केला. या पार्श्वभूमीवर सुखेंदू शेखर रे यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेतील बंडाचे पडसाद संसदेतही उमटू शकतात, असा इशारा दिला होता.

SUKHENDU SEKHAR ROY RESIGNS FROM TMC, ALLEGES CORRUPTION; BIG SETBACK FOR MAMATA BANERJEE
Shocking : संभाजीनगर हादरलं! नोकरीचं आमिष देत शिक्षिकेचं धर्मांतर, हॉटेलमध्ये नेत केले अत्याचार

राजीनामा देताना रे यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधील प्रशासन, भ्रष्टाचार आणि पक्षाच्या कमकुवतेबाबत नाराजी व्यक्त केली. सध्या तृणमूल काँग्रेसचे लोकसभेत २८ आणि राज्यसभेत १३ सदस्य आहेत. मात्र पक्षातील वाढत्या बंडखोरीमुळे आगामी काळात आणखी काही खासदार पक्ष सोडण्याची भूमिका घेऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

SUKHENDU SEKHAR ROY RESIGNS FROM TMC, ALLEGES CORRUPTION; BIG SETBACK FOR MAMATA BANERJEE
Shocking : १९ वर्षीय प्रेयसीला संपवलं! मृतदेह जंगलात फेकला; हैवान बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

दरम्यान पक्षातील बंडखोरीमुळे ममता बॅनर्जी सक्रिय झाल्या असून, राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना दिल्लीत पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या राजीनाम्यांनंतर आता दिल्लीतील राजकारणात मोठी उलथापालथ होण्य्ची शक्यता आहे. तसेच आता ममता बॅनर्जी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com