Pakistan blast update  Saam tv
देश विदेश

Pakistan: पाकिस्तानला पुन्हा हादरा! पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू

Peshawar Explosion: पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. तर ४ पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोटाची मालिका सुरूच आहे.

Priya More

Summary -

  • पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला.

  • या बॉम्बस्फोटामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला.

  • पोलिसांच्या मोबाईल व्हॅनला लक्ष्य करून हल्ला करण्यात आला.

  • या स्फोटामध्ये ४ पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.

पाकिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले. गुरूवारी सकाळी पाकिस्तानच्या पेशावर शहरामध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला. या घटनेमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला तर ४ पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर एकच खळबळ उडाली. मोठ्या आवाजाने सर्वजण सैरावैरा पळू लागले. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा बॉम्बस्फोट पोलिसांच्या मोबाईल व्हॅनच्या मार्गावर करण्यात आला. हल्लेखोरांनी पोलिसांनी लक्ष्य केले होते. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. स्फोटानंतर घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. बॉम्ब शोध पथक आणि फॉरेन्सिक टीम पुरावे गाळा करत आहे.

मंगळवारी बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. ३० सप्टेंबर रोजी फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) मुख्यालयाजवळ ही घटना घडली होती. यामध्ये ३२ जण जखमी झाले. ही बॉम्बस्फोटाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या बॉम्बस्फोटामुळे परिसरात भीतचे वातावरण होते. अनेक घरांच्या काचाही फुटल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karwa Chauth 2025: करवा चौथ कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त अन् पद्धत

Gauri Kulkarni: जशी नभीची चमचम चमके चांदणी, गौरी कुलकर्णीचा सुंदर साज

Nilesh Ghaiwal : फरार गुंड निलेश घायवळला पुणे पोलिसांचा दणका, आता बायको अन् मुलगाही अडचणीत, कारवाईची टांगती तलवार कायम

Kalyan : कचऱ्यात पडलेले गुलाबजामुन खाण्याचा मोह; मुलीची प्रकृती बिघडली, कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना

POK Erupts After Nepal: नेपाळनंतर POK पेटलं, जनतेचं बंड, मुल्ला मुनीरची घाबरगुंडी

SCROLL FOR NEXT