Bomb Blast: बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरला! आगीचे लोट, अंदाधुंद गोळीबार अन्..., ८ जण ठार, पाहा थरारक VIDEO

Pakistan Bombblast: पाकिस्तान आज सकाळी बॉम्बस्फोटाने हादरला. पाकिस्तानच्या क्वेटा शहरामध्ये ही घटना घडली. बॉम्बस्फोटानंतर अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले.
Bomb Blast: बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरला! आगीचे लोट, अंदाधुंद गोळीबार अन्..., ८ जण ठार, पाहा थरारक VIDEO
Pakistan BombblastSaam Tv
Published On

Summary -

  • क्वेटा शहरात भीषण बॉम्बस्फोट झाला

  • या बॉम्बस्फोटात ८ जणांचा मृत्यू तर अनेक गंभीर जखमी झाले.

  • स्फोटानंतर गोळीबारही करण्यात आला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

  • घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पाकिस्तान बॉम्बस्फोटाने पुन्हा हादरला. बलूचिस्तान प्रांतामधील परिस्थिती पुन्हा यामुळे नियंत्रणाबाहेर गेली. बलुचिस्तानची राजधानी क्वेटा शहरामध्ये आज सकाळी हा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. या बॉम्बस्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. शहरातील वैद्यकीय सुविधांमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली.

क्वेटामधील शरघून रोडजवळ हा बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट इतका भयंकर होता ही संपूर्ण परिसर हादरून निघाला. घाबरून सर्वजण सैरावैरा पळू लागले. बॉम्बस्फोटानंतर गोळीबार देखील करण्यात आला. या बॉम्बस्फोटात ८ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले. स्फोटाची माहिती कळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

क्वेटामध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला. या बॉम्बस्फोटामध्ये हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही समोर आले आहेत. ज्यामध्ये बॉम्बस्फोटाची घटना स्पष्ट दिसत आहे. या बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेल्या सर्वांना क्वेटा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. क्वेटामध्ये स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही.

यापूर्वी २ सप्टेंबरला माजी मुख्यमंत्री अख्तर मेंगल यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. शाहवानी स्टेडिअमच्या पार्किंगमध्ये त्यांची गाडी उभी असताना स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटामध्ये सुदैवाने माजी मुख्यमंत्री बचावले. पण पक्षाचे इतर सदस्य गंभीर जखमी झाले.

Bomb Blast: बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरला! आगीचे लोट, अंदाधुंद गोळीबार अन्..., ८ जण ठार, पाहा थरारक VIDEO
India VS Pakistan Final: 'ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन तिलक...'; भारताच्या विजयावर मराठी कलाकारांचं सेलिब्रेशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com