Cylinder Blast : मध्यरात्री हॉटेलमध्ये एकदम आगीचा भडका,  २ सिलिंडरचा स्फोट, दुकाने जळून खाक, अंबाजोगाईत आगीचे तांडव
Beed NewsSaam Tv

Cylinder Blast : मध्यरात्री हॉटेलमध्ये एकदम आगीचा भडका, २ सिलिंडरचा स्फोट, दुकाने जळून खाक, अंबाजोगाईत आगीचे तांडव

Beed News : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे रात्री उशिरा भीषण आग लागली. सोमेश्वर हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत दोन गॅस सिलेंडर स्फोट झाले. या स्फोटामुळे परिसर हादरून गेला आहे.
Published on
Summary
  • घाटनांदूरमध्ये रात्री उशिरा सोमेश्वर हॉटेलमध्ये भीषण आग.

  • दोन गॅस सिलेंडर स्फोटामुळे परिसर हादरून गेला.

  • शेजारच्या दुकानांचे मोठे नुकसान, जीवितहानी टळली.

  • अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू, पोलिस तपासाखाली आग लागण्याचे कारण.

बीड च्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास भीषण अपघात घडला. सोमेश्वर हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत एकामागोमाग दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. दुकानावरील पत्रे उडून गेली तर शेजारच्या दुकानांनाही मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, डिडवाणी यांच्या पाईपच्या दुकानात प्रथम आग लागली. ही आग काही वेळातच शेजारील अरसुडे यांच्या सोमेश्वर हॉटेलमध्ये पसरली. आगीत हॉटेलमधील गॅस सिलेंडर पेट घेऊन सलग दोन स्फोट झाले. या स्फोटांच्या धक्क्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Cylinder Blast : मध्यरात्री हॉटेलमध्ये एकदम आगीचा भडका,  २ सिलिंडरचा स्फोट, दुकाने जळून खाक, अंबाजोगाईत आगीचे तांडव
Beed : बीड पुन्हा हादरलं! शिक्षिकेवर १६ वर्षे अत्याचार, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा

आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत असल्याने दूरवरून धुराचे लोट दिसत होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आगीत नेमके किती नुकसान झाले आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र आजूबाजूच्या अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. रात्रीची वेळ असल्याने सर्व दुकाने बंद झाली होती, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

Cylinder Blast : मध्यरात्री हॉटेलमध्ये एकदम आगीचा भडका,  २ सिलिंडरचा स्फोट, दुकाने जळून खाक, अंबाजोगाईत आगीचे तांडव
Beed Crime: संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळला, तरुणाने आयुष्य संपवलं; बीडमध्ये खळबळ

घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई आणि परळी येथील अग्निशमन दल तातडीने दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अद्यापही आग धुमसत असल्याची माहिती आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे तपासाअंती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या भीषण घटनेमुळे घाटनांदूरमध्ये काही काळ भीतीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com