Talangana Crime Saam tv
देश विदेश

Shocking: बायकोचे १०० पुरूषांसोबत शरीरसंबंध, नवरा गुपचूप व्हिडीओ काढायचा; खतरनाक रॅकेटमागची स्टोरी वाचून हादरून जाल!

Talangana Sex Racket-: तेलंगणामध्ये नवरा-बायकोला सेक्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी अटक केली. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवायचे. बायको शरीरसंबंध ठेवायची आणि नवरा व्हिडीओ बनवायचा.

Priya More

Summary -

  • तेलंगणामध्ये मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

  • सोशल मीडियावर आकर्षित करणारे फोटो टाकून महिला पुरूषांना जाळ्यात अडकवायची

  • घरी बोलावून त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवायची

  • महिलेचा नवरा गुपचूप व्हिडीओ शूट करायचा

  • त्यानंतर या व्हिडीओद्वारे ब्लॅकमेलिंग केले जायचे

तेलंगणामध्ये मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. तेलंगणाच्या करीमनगर जिल्ह्यातली ही खळबळजनक घटना आहे. कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी एका सोशल मीडिया 'क्वीन' आणि तिच्या पतीने 'हनीट्रॅप' आणि ब्लॅकमेलिंगचा घाणेरडा खेळ खेळला. त्यांनी मिळून १५०० लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. पीडित व्यक्तींपैकी एकाने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर या कपलचा खरा चेहरा समोर आला. पोलिसांनी या नवरा-बायकोला अटक केली.

पोलिसांनी सेक्स रॅकेट प्रकरणी नवरा-बायकोला अटक करत त्यांची चौकशी केली. पोलिसांनी सांगितले की, दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरूषांना टार्गेट करायचे. सुंदर आणि आकर्षित फोटो आणि व्हिडीओ टाकायचे आणि पुरूषांना आपल्या जाळ्यात अडकवून घरी बोलवायचे. महिला त्या पुरूषांसोबत शरीरसंबंध ठेवायची. तर तिचा नवरा प्रायव्हेट व्हिडीओ शूट करायचा. या व्हिडीओद्वारे दोघेही पुरूषांना ब्लॅकमेलिंग करत त्यांच्याकडून पैसे उकळायचे.

पोलिस तपासातून समोर आले की, या कपलचा मार्बलचा बिझनेस होता. या व्यवसायात त्यांना मोठे नुकसान झाले होते. यासोबतच त्यांनी एक फ्लॅट खरेदी केला होता. त्याचे ईएमआय देखील सुरू होते. सतत वाढणारे कर्ज आणि आर्थिक ओझं वाढत चालल्यामुळे या नवरा बायकोंनी हा प्लान तयार करून सेक्स रॅकेट सुरू केले. त्यानंतर गेल्या ३ वर्षांपासून त्यांनी अनेकांची फसवणूक केली.

पोलिसांनी सांगितले की, महिला सोशल मीडियावर आपले आकर्षित आणि बोल्ड फोटो शेअर करायची. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करायची. तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून अनेक जण तिच्या जाळ्यात अडकायचे. त्यानंतर ही महिला त्या पुरूषांना घरी बोलवायची. त्यांच्यासोबत ती शरीरसंबंध ठेवायची. या महिलेचा नवरा गुपचूप त्यांचे व्हिडीओ शूट करायचा. त्यानंतर या व्हिडीओद्वारे ते त्यांच्याकडे पैशांची मागणी करायचे. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचे. असे करत ते त्यांच्याकडून पैसे कमवायचे.

तपासातून अशी देखील माहिती समोर आली आहे की, गेल्या ३ वर्षांत या कपलने १०० पेक्षा अधिक व्यक्तींना आपल्या जाळ्यात अडकवत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसुल केली. या महिलेने या १०० व्यक्तींसोबत शरीरसंबंध ठेवले. तर १५०० पेक्षा अधिक जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवले होते. या कपलने एका बिझनेसमनकडून १३ लाख रुपये मागितले होते. त्यानंतर आणखी ५ लाख रुपयांची मागणी केली होती. या बिझनेसमनने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली. या सेक्स रॅकेटमध्ये आणखी कुणी सहभागी आहे की नाही याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

अमेरिकेचा हेकेखोरपणा, जगात युद्ध भडकणार? डोनाल्ड ट्रम्प यांची रणनीती काय? VIDEO

SCROLL FOR NEXT