Navi Mumbai: नवी मुंबईत होळीच्या दिवशी भयंकर अपघात, दुचाकीला कारने उडवलं; तरुणाचा जागीच मृत्यू

Navi Mumbai Accident: नवी मुंबईत होळीच्या दिवशी झालेल्या भीषण रस्ते अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. पाम बीच रोडवर मध्यरात्री ही घटना घडली होती. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
Navi Mumbai: नवी मुंबईत होळीच्या दिवशी भयंकर अपघात, दुचाकीला कारने उडवलं; तरुणाचा जागीच मृत्यू
Navi Mumbai AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • होळीच्या दिवशी नवी मुंबईतील पाम बीच रोडवर भीषण अपघात

  • दुचाकीला कारची जोरदार धडक

  • दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू

  • अपघातामध्ये तरुणी गंभीर जखमी

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईमध्ये होळीच्या दिवशी भयंकर रस्ते अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवर ही घटना घडली. दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. कारच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर कार चालक फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत कारचालकाचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी नवी मुंबईत पाम बीच रोडवर दुचाकीला कारने धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीचा चुराडा झाला. मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास पाम बीच रोडवर ही घटना घडली. तरुण आणि तरुणी दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी पाम बीच रोडवर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. तरुण आणि तरुणी रस्त्यावर खाली पडले. तरुण रस्त्याच्या मधोमध पडला. याचवेळी पाठीमागून आलेल्या कारच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला.

Navi Mumbai: नवी मुंबईत होळीच्या दिवशी भयंकर अपघात, दुचाकीला कारने उडवलं; तरुणाचा जागीच मृत्यू
Accident: होळी साजरी करायला जाताना काळाचा घाला, बसची कारला जोरदार धडक, ६ जणांचा मृत्यू

या अपघातामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. या अपघातानंतर दोन्ही कारचे चालक घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिस या दोन्ही कार चालकांचा शोध घेत आहेत. तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Navi Mumbai: नवी मुंबईत होळीच्या दिवशी भयंकर अपघात, दुचाकीला कारने उडवलं; तरुणाचा जागीच मृत्यू
Singer Accident: मुंबईतील शोआधी प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल, आता कशी आहे प्रकृती?

दरम्यान, पनवेल येथे राहणाऱ्या नवविवाहित तरुणाचा मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने या तरुणाच्या दुचाकीला धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची बायको जखमी झाली होती. ही घटना नागोठणे येथे घडली. ८ दिवसांपूर्वीच तरुणाचे लग्न झाले होते मात्र सुखी संसार सुरू होण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर काळाचा घाला घातला.

Navi Mumbai: नवी मुंबईत होळीच्या दिवशी भयंकर अपघात, दुचाकीला कारने उडवलं; तरुणाचा जागीच मृत्यू
Accident News : अकोल्यात अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने तीन शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडलं, मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com