Ahmedabad Saam
देश विदेश

Air India Plane Crash: मुलाला वाचवण्यासाठी आईची धडपड, आगीत होरपळून रस्त्यावर मदतीसाठी धावली; पण शेवटी..VIDEO

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात चहाच्या टपरीवर झोपलेला १६ वर्षीय आकाश जळून मृत्युमुखी पडला. त्याची आई सीताबेन गंभीर भाजली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bhagyashree Kamble

अहमदाबादमधील मेघाणीनगर परिसरात घडलेल्या भीषण एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता २७० वर पोहोचला आहे. या अपघातात केवळ विमानातील प्रवाशांचाच नव्हे, तर बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील काही विद्यार्थी आणि परिसरातील स्थानिक रहिवासीही मृत्युमुखी पडले आहेत. या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला चहाची टपरी चालवणाऱ्या महिलेच्या मुलाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर, त्याची आई गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेघाणीनगर परिसरात विमान अपघाताची दुर्घटना घडली. सीताबेन असे महिलेचे नाव आहे. आकाश (वय वर्ष १६) असे मृत मुलाचे नाव आहे. आकाश हा चहाच्या टपरीवरच होता. दुपारची वेळ होती. ग्राहकांची वर्दळ कमी होती. म्हणून आकाश चहाच्या टपरीजवळच झोपला होता. त्याचवेळी एअर इंडियाचे विमान अचानक अपघातग्रस्त झाले आणि मोठा स्फोट झाला.

विमानाने काही क्षणातच पेट घेतली. स्फोट इतका जोरदार होता की, आग जवळच्या दुकानांमध्ये आणि स्टॉल्समध्ये पसरली. चहाच्या टपरीवर झोपलेला १६ वर्षीय तरूण आगीच्या कचाट्यात सापडला. तो आगीत गंभीरपणे भाजला. त्याने मदतीसाठी आईला हाक मारली. त्याची आई सीताबेन यांनी पाहिल्यानंतर त्याच्या मदतीसाठी ताबडतोब धावून गेल्या.

आईने त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने तिलाही वेढले. या घटनेची माहिती मिळताच सीताबेनचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. सीताबेन आणि आकाशला दोघांनाही तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तापासून आकाशला मृत घोषित केले. आकाशची आई सीताबेन यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. तिच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आकाशच्या काकींनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश घटनास्थळावरील चहाच्या टपरीवर झोपला होता. अचानक एअर इंडिया विमानाचा अपघात घडला. क्षणात परिसरात आग पसरली. आगीने रौद्ररूप धारण केलं. काही क्षणात आगीत चहाची टपरी जळाली. टपरीवर झोपलेल्या तरूणाचाही यात मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT