Ahmedabad Airplane Crash: 'बाबा, काळजी करू नका...', रिक्षा चालवून वडिलांनी मुलीला शिकवलं; नोकरीसाठी लंडनला पोहण्याआधीच मुलीचा करुण अंत

Air India Crash: पहिल्यांदाच विमानप्रवास करत असलेली पायल खटिक लंडनला नोकरीसाठी निघाली होती. मात्र, टेकऑफनंतर काही सेकंदात विमान कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला.
AIr India Crash
AIr India CrashSaam
Published On

गुरुवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे भीषण विमान अपघात घडला. एअर इंडियाचे विमान टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच कोसळले. या भीषण दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला असून, काही वैद्यकीय विद्यार्थ्यांचाही यात समावेश होता. कुणी शोकसभेला, तर कुणी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रवास करत होते. परंतु, एका रिक्षाचालकाच्या मुलीवर लंडनमध्ये नोकरीच्या निमित्ताने रवाना होण्यापूर्वीच काळाने झडप घातली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

पायल खटिक असे मृत तरूणीचे नाव आहे. मूळची राजस्थानची असलेली पायल गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबासोबत गुजरातमधील हिम्मतनगर येथे राहत होती. पायलचे वडील सुरेशभाई खटिक हिम्मतनगरमध्ये रिक्षा चालवतात. मोठ्या कष्टातून त्यांनी आपल्या मुलीला शिकवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला लवकरच चांगली नोकरी मिळाली.

AIr India Crash
Ahmedabad Plane Crash: 'आपण लवकरच भेटू', टेकऑफपूर्वी घरच्यांना शेवटचा फोन; मुलुंडच्या श्रद्धाचाही अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू

एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या पायलला कंपनीच्या कामासाठी लंडनला पाठवण्यात येत होते. विशेष म्हणजे, हा तिचा पहिलाच विमान प्रवास होता. ती दूर जाणार म्हणून तिला विमानतळावर सोडायला येताना वडिलांना अश्रु अनावर झाले. त्यांना कल्पना नव्हती आपली मुलगी कायमची इतकी दूर जाईल. अपघाताची बातमी मिळताच खटिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

AIr India Crash
Kamal Kaur Bhabi: अश्लील VIDEO पोस्ट केल्यावरून वाद टोकाला गेला, ‘कमल कौर भाभी’ची हत्या

आई बेशुद्ध झाली आणि वडील सुरेशभाई थरथरून रडू लागले. जाण्यापूर्वी पायलने, 'बाबा, काळजी करू नका. मी नीट जाईन. पहिल्यांदाच विमानात बसतेय, पण सगळं ठीक होईल', असं ती म्हणाली होती. मात्र, स्वप्न पूर्ण करण्यासाठी जाणाऱ्या तरूणीचा ध्येय गाठण्यापूर्वीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com