Kamal Kaur Bhabi: अश्लील VIDEO पोस्ट केल्यावरून वाद टोकाला गेला, ‘कमल कौर भाभी’ची हत्या

Influencer Kamal Kaur’s Body Found in Car: सोशल मीडियावर ‘कमल कौर भाभी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या इन्फ्लुएंसर कांचन कुमारीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिचा मृतदेह कारमध्ये पार्किंगमध्ये आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Kamal Kaur
Kamal KaurSaam
Published On

सोशल मीडियावर ‘कमल कौर भाभी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या इन्फ्लुएंसर कांचन कुमारी हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिचा मृतदेह कारमध्ये पार्किंगमध्ये आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून, मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.

बुधवारी सायंकाळी चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरील एका खासगी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये उभी असलेल्या कारच्या मागील सीटवर कांचनचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास केला. प्राथमिक तपासात तिची ओळख 'कमल कौर भाभी' या नावाने झाली असून, ती सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स असलेली इन्फ्लुएंसर होती.

Kamal Kaur
Ahmedabad Air India crash:'२ एअर होस्टेस अन् काका - काकी, माझ्यासमोर जळत होते', एअर इंडिया विमान अपघातात 'तो' १ प्रवासी कसा वाचला?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलीस विभागाचे एसपी नरिंदर सिंह म्हणाले की, 'आमचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा गाडीच्या मागच्या सीटवर एका महिलेचा मृतदेह होता. तिची ओळख पटली असून, कांचन कुमारी उर्फ कमल कौर अशी माहिती समोर आली आहे'.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. निहंग अमृतपाल मेहरों आणि त्याच्या २ साथीदारांनी मिळून या हत्येचा कट रचला होता. दरम्यान, मेहरोंला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे. कांचनच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत आरोपी मेहरोंने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

Kamal Kaur
Ahmedabad Plane crash: मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन अन् बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी दाखल, रूग्णालयातही देणार भेट

'खालसा कधीही महिलांवर अत्याचार करत नाही. परंतु जेव्हा त्या महिलेनं आमच्या तत्वांवर हल्ला केला. तेव्हा तिला आम्ही संपवलं. शीख इतिहास आणि संस्कृतीला बदनाम करण्यासाठी कौर या नावाचा गैरवापर करणाऱ्या कांचनला शिक्षा झाली आहे', असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी मेहरोंने कांचनला सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

Kamal Kaur
Air India Plane Crash: अहमदाबादमधील विमान अपघाताचा दुसरा VIDEO; धुरानं काळवंडलेला परिसर आणि सांगाडा

कांचन ही इन्फ्लुएंसर कमल कौर भाभीच्या नावाने सोशल मीडियावर अश्लील रील्स तयार करून पोस्ट करीत होती. तिचे लाखोंच्या घरात फॉलोअर्स होते. ७ महिन्यांपूर्वी अर्श डल्ला यानेही तिला अश्लील कंटेंटमुळे तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com