Ahmedabad Air India crash:'२ एअर होस्टेस अन् काका - काकी, माझ्यासमोर जळत होते', एअर इंडिया विमान अपघातात 'तो' १ प्रवासी कसा वाचला?

Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू. नागपूरच्या एका कुटुंबातील तिघांचा दुर्देवी अंत. फक्त एक प्रवासी बचावला. ब्लॅक बॉक्स सापडला, तपास सुरू.
Ahmedabad Airplane crash
Wreckage of the Air India flight that crashed in Ahmedabad, where 265 lives were lost. Only one passenger survived the tragedy.Ahmedabad Airplane crash
Published On

गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला. विमानातील २४१ तर, ज्या भागात विमान कोसळलं, त्या भागातील २४ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात एक प्रवासी बचावला आहे. तो प्रवासी ११ A या सीटवर बसला होता. सध्या त्याच्यावर रूग्णलयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून, डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. हा अपघात नेमका कसा घडला? या अपघाताचा थरार त्यांनी सांगितला आहे.

अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवासी बचावला होता. रमेश विश्वाकुमार (वय वर्ष ४०) असे प्रवाशाचे नाव आहे. तो विमानातील ११ A या सीट नंबरवर बसला होता. त्याने या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. 'विमानाचा ज्या भागात माझी सीट होती, तो भाग इमारतीच्या खालच्या भागात आदळला असावा, असा अंदाज आहे. वरच्या भागाला आग लागली. मी सीटसह खाली पडलो. मी कसा तरी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला भिंत होती. कदाचित त्यामुळे कुणीही तेथून बाहेर पडू शकलं नाही', अशी माहिती त्यांनी दिली.

Ahmedabad Airplane crash
Air India Plane Crash: संतापजनक! विमान अपघातात रक्ताळलेलं स्त्रीचं शीर रस्त्यावर पडलं, बघ्यांनी सेल्फी काढली

रमेश कुमार म्हणाले, 'अपघात घडल्यानंतर समोर माझ्या भीषण दृश्य होती. माझ्या डोळ्यासमोर २ एअर होस्टेस, काका, काकू, चिमुकले आगीमध्ये जळत होते', अशी माहिती त्यांनी दिली. या अपघातात विश्वासचा डावा हात गंभीर भाजला. सुदैवाने त्यांचा या अपघातात प्राण वाचले. सध्या अपघाताच्या थराराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Ahmedabad Airplane crash
Ahmedabad Air India: नागपूरहून शोकसभेसाठी निघाले, काळाने घाला घातला; ३ जणांचा विमान अपघातात मृत्यू

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला

अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. यात दोन गोष्टी असतात, फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर. या रेकॉर्डरमधून महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. तर, दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू आहे. पहिला ब्लॅक बॉक्स हा दिल्लीमध्ये पाठवण्यात आला आहे. ब्लॅकबॉक्स सापडल्यामुळे अपघाताच्या कारणाचा लवकरच उलगडा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com