Ahmedabad Plane Crash: 'आपण लवकरच भेटू', टेकऑफपूर्वी घरच्यांना शेवटचा फोन; मुलुंडच्या श्रद्धाचाही अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू

Shraddha Dhawan Dies in Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात मुंबईच्या श्रद्धा धवन यांचा मृत्यू. त्या एअर इंडियात सीनियर क्रू मेंबर होत्या. ओळख पटवण्यासाठी डीएनए तपासणी सुरू आहे. परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
Ahmedabad plane crash
Ahmedabad plane crashSaam
Published On

अहमदाबादहून लंडनच्या दिशेनं निघालेल्या एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात घडला. गुरूवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आतंरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेंकदात भींतीला धडक देत मेघानीनगर परिसरात कोसळले. भीषण अपघातात मोठा स्फोट झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. या अपघातात एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला. ज्यात १२ क्रू मेंबर्स आणि २ पायलटचा समावेश होता. या अपघातात श्रद्धा धवन यांचा देखील दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्या मुंबईतील मुलुंड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

श्रद्धा धवन या एअर इंडियामध्ये सीनियर ग्रुप मेंबर होत्या. गेल्या २० वर्षांपासून त्या एअर इंडियामध्ये नोकरी करत होत्या. त्यांचाही या भयानक अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगी आणि सासू- सासरे असा परिवार आहे. त्यांचे पती देखील एअर इंडियामध्येच कार्यरत होते. ड्युटी जॉईन करण्यापूर्वी त्यांनी आपल्या घरच्यांना फोन केला आणि फोनवर त्यांनी आपण लवकरच भेटू असं सांगितलं. मात्र, त्यानंतर त्यांचा भीषण अपघात घडला.

Ahmedabad plane crash
Ahmedabad Air India crash:'२ एअर होस्टेस अन् काका - काकी, माझ्यासमोर जळत होते', एअर इंडिया विमान अपघातात 'तो' १ प्रवासी कसा वाचला?

सध्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केले जाणार आहे. या टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार आहे. या भीषण विमान अपघातात मृतदेहांची अवस्था कोळशाप्रमाणे झाली होती. काही मृतदेहांचे अवयव छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले. त्यामुळे मृतांची ओळख पटवण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे डीएनए टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.

Ahmedabad plane crash
Ahmedabad Plane crash: मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन अन् बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी दाखल, रूग्णालयातही देणार भेट

श्रद्धा यांच्या मृतदेहाची ओळख देखील डीएनए टेस्टद्वारे केली जाणार असल्याची माहिती आहे. श्रद्धा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, या भीषण अपघातात एक प्रवासी सुदैवाने बचावला आहे. एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, विमानातील ११ A सीटवर बसलेले रमेश विश्वकुमार यांचे प्राण वाचले आहे. या अपघातानंतर डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com