tamilnadu gym trainer faked wife killed claims Saam Tv News
देश विदेश

शरीरसंबंधावेळी पत्नीचा मृत्यू, जिम ट्रेनरचा दावा; पोस्टमार्टेम रिपोर्टने बिंग फुटलं, मृत्यूचं गूढ उकललं

Gym Trainer Wife Dies : पोलिसांनी भास्करला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातून अटक केली. भास्कर आणि शशिकला यांचा प्रेमविवाह होता. २०१८ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं.

Prashant Patil

चेन्नई : आपल्या बायकोची हत्या केल्याप्रकरणी ३४ वर्षीय जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. सेक्स करत असताना पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा जिम ट्रेनरने केला होता. पण पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा दावा खोटा आढळून आला आहे. त्यानंतर पोलिसांनी जिम ट्रेनरला बेड्या ठोकल्या. भास्कर असं जिम ट्रेनरचं नाव आहे. तो ४ जिम चालवतो. तर त्याची पत्नी शशिकला देखील महिलांसाठी एक जिम चालवायची. जोडप्याला ४ आणि २ वर्षांची मुलं देखील आहेत.

पोलिसांनी भास्करला पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातून अटक केली. भास्कर आणि शशिकला यांचा प्रेमविवाह होता. २०१८ मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. बंगळुरुत असताना शशिकला भास्करच्या प्रेमात पडली होती. भास्करचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय शशिकलाला होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. ३० एप्रिलला भास्करने शशिकलाला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. पत्नीच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरु झाला आणि सेक्स करताना ती बेशुद्ध पडली, असं भास्करनं डॉक्टरांना सांगितलं.

डॉक्टरांनी शशिकलाला मृत घोषित केलं. रुग्णालयाने याबद्दलची माहिती सिपटोक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांना शशिकलाच्या गळ्याजवळ खुणा दिसल्या. शशिकलाचा मृत्यू गळा दाबल्याने झाला असावा असा संशय त्यांना आला. त्यांनी शशिकलाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांना भास्करबद्दल शंका आल्याने त्यांनी चौकशी सुरु केली. शशिकला दारु प्यायली होती. त्यानंतर आम्ही बॉन्डेज सेक्स केला. त्यावेळी तिचा मृत्यू झाल्याचं भास्करने पोलिसांना सांगितलं. पण शवविच्छेदन अहवालानं भास्करचे बिंग फुटले. शशिकलाचा मृत्यू हा पूर्वनियोजित हत्या असल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी भास्करला बेड्या ठोकल्या.

भास्करने लग्नाच्यावेळी १४ लाख रुपये हुंडा घेतला होता. त्यानंतरही तो शशिकलाशी भांडायचा, असा दावा शशिकलाचे वडील अरुल यांनी केला. 'दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. त्याने हात, पाय बांधून तिची हत्या केली. मग तिला रुग्णालयात नेलं. तिथून त्याने मला फोन केला आणि तुझी लेक दगावली आहे,' असं सांगितलं. 'तो तिला मारहाण करायचा. आम्ही तिला याआधीही दोनदा रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी आम्ही पोलीस तक्रार देखील दाखल केली होती,' असं अरुल यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT