Maharashtra Board HSC Results Date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) बारावीचा (HSC) निकाल सोमवार, ५ मे २०२५ रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाकडून सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत निकालाबाबत (12th result date and time) सविस्तर माहिती दिली जाईल. दुपारी एक वाजता विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळ mahresult.nic.in वर निकाल पाहू शकतील. (Maharashtra board 12th result date and time)
यंदा बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल्या होत्या. लाखो विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांतून परीक्षा दिली आहे. निकालाची प्रतीक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सोमवारचा दिवस (Maharashtra board result guidelines) महत्त्वाचा असणार आहे. बोर्डाने निकाल प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी यंदा विशेष प्रयत्न केले असून, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे निकाल (mahresult.nic.in) सहज उपलब्ध होईल, अशी व्यवस्था केली आहे. निकालानंतर पुनर्मूल्यांकन किंवा पडताळणीसाठी अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध असेल. बारावीच्या निकालाबाबत माहिती देतानाच बोर्डाने चार महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. पाहूयात नेमकं काय सांगितलेय?
ऑनलाईन निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. त्यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी मंगळवार ०६ मे ते २० मे पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे.
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या ५ दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक असेल.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (३.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जुन-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जुन-जुलै २०२६) श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
जुन-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ०७ मे २०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.