palani swamy and Thalapathy vijay Tamil nadu politics saam tv
देश विदेश

Politics : प्रस्थापित राजकीय पक्षाला जोरदार झटका; ४ आमदारांचे तडकाफडकी राजीनामे, तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ

four aiadmk mlas resign in tamil nadu : तमिळनाडू राजकारणात मोठा उलटफेर झालाय. एआयएडीएमकेच्या चार आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सुपुर्द केला आहे. या आमदारांनी आता सत्ताधारी पक्ष टीव्हीकेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

Nandkumar Joshi

तमिळनाडूमध्ये थलापती विजय यांचं सरकार आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी टीव्हीके पक्षाची ताकद दिवसागणिक वाढत आहे. आता राज्याच्या राजकारणात आणखी मोठा उलटफेर झाला आहे. एआयएडीएमकेच्या चार आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यातील तीन आमदारांनी विजय यांच्या टीव्हीके पक्षात प्रवेश केला आहे. या सर्व आमदारांनी विधानसभा अध्यक्ष जेसीडी प्रभाकर यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजीनामा दिलेल्या आमदारांनी टीव्हीकेच्या चिन्हावर पोटनिवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. या घडामोडींमुळं एआयएडीएमके प्रमुख पलानीस्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तर एआयएडीएमकेच्या बंडखोर गटातील आमदारांची संख्या १७ वर पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात एआयएडीएमकेचे आणखी काही बंडखोर आमदार राजीनामे देऊन सत्ताधारी टीव्हीके पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ते आमदार देखील टीव्हीकेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे कळते. त्यामुळे विजय यांना मोठा राजकीय फायदा होऊ शकतो.

ज्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि एआयएडीएमकेचा पाठिंबा घेतल्याने नाराज आहेत, ते पक्ष आता शांत होणार आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे टीव्हीकेकडे १०७ आमदार आहेत. जर एआयएडीएमकेच्या बंडखोर आमदार टीव्हीकेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असतील तर, मुख्यमंत्री विजय हे स्वतःच्या पक्षाकडील बळावर बहुमताचा आकडा पार करू शकतात.

बंडखोर आमदारांचे राजीनामे नामंजूर करण्यात यावेत, अशा विनंतीचे पत्र एआयएडीएमके पक्षाचे एडप्पाडी पलानी स्वामी यांच्या वतीने विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे. पक्षात बंडखोरी करणाऱ्या या आमदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई प्रलंबित असून, ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांचे राजीनामे मंजूर करू नयेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, नुकत्याच झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागांवर विजय मिळवला. तुलनेने नवखा असलेला हा पक्ष राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. इतकेच नाही तर, अन्य पक्षांच्या पाठिंब्यावर विजय यांनी सरकार स्थापन केले. टीव्हीके प्रमुख विजय हे स्वतः दोन मतदारसंघांतून निवडून आले. तर डीएमके यांना ५९, एआयएडीएमके यांना ४७ जागांवर विजय मिळवता आला. याशिवाय २० जागांवर अन्य पक्षांनी विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवसाढवळ्या शिंदे गटाच्या बड्या नेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Dombivli Crime: डोंबिवली हादरली! तरुणाकडून शेजारच्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार करत संपवलं

Birds Predict Monsoon: चातकचं नव्हे आपल्या आजूबाजूला असणारे हे पक्षी देतात पावसाची चाहूल, कसं जाणून घ्याल

Maharashtra News Live Update: पुण्यातील सारसबाग पुढील २ दिवस राहणार बंद

Crime: बॉयफ्रेंडला भेटायला गेलेल्या तरुणीवर गँगरेप, जबरदस्ती प्रायव्हेट व्हिडीओ बनवले अन्...

SCROLL FOR NEXT