Manasvi Choudhary
तामिळनाडू येथे पर्यटकांची गर्दी होते. तुम्ही देखील उन्हाळ्याच्या सुट्टीत तामिळनाडू फिरण्याचा प्लान करणार असाल तर या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या.
तमिळनाडूतील ऊटी, येलगिरी, चेन्नई, येरकोड आणि मसिनागडी ही ठिकाणे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
उटकामंड म्हणजे तामिळनाडूमधील ऊटी हे प्रसिद्ध शहर आहे. पर्वत, तलाव आणि नैसर्गिक धबधब्यांमुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
तमिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून 1,100 मीटर उंचीवर वसलेले येलगिरी हे गुलाबाच्या बागा आणि हिरव्यागार निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे उन्हाळी सुट्टीत तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
तमिळनाडूतील चेन्नई हे शहर प्रसिद्ध आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारावर वसलेले हे शहर पर्यटकांसाठी लोकप्रिय आहे.
1,515 मीटर उंचीवर घाटात वसलेले येरकोड हे ठिकाण तलाव, जंगल नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं आहे.
मसिनागुडी हे तामिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यात वसलेले प्रसिद्ध शहर आहे. घनदाट जंगल, चहा आणि कॉफीचे मळे येथे आहेत.पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटक धबधबे आणि ट्रेकिंगसाठी येतात.
या ठिकाणांना अनेक सेलिब्रिटी, बॉलिवूड कपल फॅमिली पिकनीक म्हणून भेट देतात.