Manasvi Choudhary
उन्हाळ्यात किडनी स्टोनचा त्रास अधिक होतो यासाठी तुम्ही आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे.
शरीरातील पाण्याची कमतरता तसेच जंकफूडच्या सेवनाने किडनी स्टोन तयार होतात यामुळे कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे जाणून घ्या.
अनेकदा आपण रोजच्या आहारात असे पदार्थ खातो ज्यामुळे किडनी स्टोन तयार होतो. यासाठी कोणते पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत.
पालकची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी पालकच्या भाजीमुळे किडनीच्या समस्या निर्माण होतोत. ज्यांना किडनीचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी आहारात पालक भाजी खाणे टाळावे.
शेंगदाणे आणि तीळ यामधील ऑक्झॅलेटमुळे शरीरात किडनी स्टोन तयार होतात.
शरीरात सोडियमचे प्रमाण अधिक झाल्याने किडनी स्टोनचा त्रास होतो. पदार्थातील मिठाचे प्रमाण कमी करा व जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे टाळा.
चिकन, अंडी याच्या अतिसेवनामुळे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते. युरिक अॅसिड मूत्रपिंडात जमा झाल्याने खडे तयार होतात. यामुळे किडनी स्टोनचा त्रास वाढतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.