आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती महिवाल यांनी १३ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या पीएने त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचे पीए विभव कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. खासदार स्वाती मालीवाल यांनी केजरीवाल यांचे सहकारी विभव यांच्यावर कथित हल्ल्याचा आरोप केलाय. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना समन्स बजावले आहेत.
आज सकाळी अकरा वाजता त्यांना चौकशीला हजर राहण्याबाबत सांगितलं गेलं होतं. तर दुसरीकडे स्वाती मालीवाल (Swati Maliwal Assult Case) यांचं एम्स रूग्णालयात मेडिकल करण्यात आलं आहे. स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. दिल्ली पोलिसांचं पथक मध्यरात्री केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. त्यावेळी विभव कुमार घरी नव्हते. त्यांच्या पत्नी एकट्याच घरी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनप्रकरणी पोलिसांनी एफआयआर (Vibhav Kumar) दाखल केली आहे. याविरोधात मुख्यमंत्र्यांच्या पीएविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार फक्त विभव कुमार यांच्याविरोधात करण्यात आली आहे. यावेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. त्यांनी ४ दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांना केलेल्या पीसीआर कॉलसंदर्भात देखील सविस्तर माहिती दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी १६ मे रोजी याप्रकरणी हल्ला, विनयभंग आणि धमकावणे या कलमांखाली तक्रार नोंदवली (Swati Maliwal) आहे. रात्री उशिरा स्वाती मालीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. पोलीस विभव कुमारचा शोध घेत आहेत.
स्वाती मालीवाल १३ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या (Delhi News) होत्या. ड्रॉईंग रुममध्ये वाट पाहत असताना विभवने गैरवर्तन केल्याचा दावा स्वाती यांनी तक्रारीत केला आहे. त्यांना मारहाणीसाठी कोणीही प्रेरित केलं नसल्याचं मालीवाल यांनी म्हटलं आहे. त्यानंतर स्वाती यांनी पीसीआर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. नंतर स्वत: पोलीस ठाणे गाठलं.
यावर बोलताना राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, आम्ही बारकाईने या प्रकरणाकडे पाहत होतो. आमच्यात मतभेद होते, पण आम्ही नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. स्वाती बोलू शकते असे वाटल्यावर त्यांनी काल तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. कारवाईचा अहवाल तयार केला आहे. स्वाती यांच्यावर मानसिक आणि शारीरिक आघात झाला आहे. पोलीस विभव कुमार यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांची पत्नी यांची देखील चौकशी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.