Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Swati Maliwal Case : मारहाणीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच आपच्या नेत्या स्वाती मालीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाच राजकारण करू नये अशी विनंती भाजपच्या नेत्यांना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Swati Maliwal
Swati MaliwalSaam Digital
Published On

माझ्यासोबत जे झालं ते खूप वाईट असून याची माहिती पोलिसांना दिली आहे. या कठीण काळात माझ्या सोबत राहिलेल्या सर्वांचे आभार, मात्र या प्रकरणाच राजकारण करू नये अशी विनंती भाजपच्या नेत्यांना आहे, अशी प्रतिक्रिया आपच्या नेत्या स्वाती मालीवाल यांनी मारहाणीच्या घटनेनंतर पहिल्यांदाच दिली आहे.

आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाण प्रकरणान सध्या चांगलंच चर्चेत आहे. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीएस विभव कुमार यांनाराष्ट्रीय महिला आयोगाने समन्स बजावले आहेत. चौकशीसाठी उद्या म्हणजेच शुक्रवारी हजर राहावं लागणार आहे. याचदरम्यान दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अतिरिक्त सीपी मालीवाल यांच्या घरी पोहोचले होते.

केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याचं म्हटलंय. त्यावर आयोगाने १७ मे रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी घेण्यात येणार असल्याचं म्हटलंय. या सुनावणीसाठी बिभव कुमार यांना हजर राहावं लागणार आहे. जर आयोगासमोर हजर न झाल्यास बिभव कुमार यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.

Swati Maliwal
Swati Maliwal: ब्रेकिंग! CM केजरीवाल यांच्या पीएकडून खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण? पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल

दरम्यान भाजच्या महिला अध्यक्षांनी स्वाती मालीवाल यांनी जे घटलं त्याची सविस्तर माहिती पोलिसांनी द्यावी, असं पत्र स्वाती मालीवाल यांना लिहिलं होतं. त्यानंतर स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून माझ्या सोबत जे घडलं ते खूपचं वाईट होतं, पण भाजपच्या नेत्यांनी याचं राजकारण करू नये म्हणत सुनावलं आहे.

Swati Maliwal
Covaxin Side Effects : नागरिकांची चिंता वाढली! कोवॅक्सिन घेतल्यावरही दुष्पपरिणाम, तरुणींवर अधिक परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com