नवी दिल्ली : देशातील बहुतांश जणांनी कोरोना काळात कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिनच्या लसी घेतल्या होत्या. आता हळूहळू या लसीचे दुष्पपरिणाम देखील समोर येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रिटीश कंपनी एस्ट्राजेनिकाने कोर्टात मान्य केलं होतं, या लसीमुळे काही लोकांना गंभीर आजार होऊ शकतात. त्यानंतर भारत बायोटेक कंपनीची लस 'कोवॅक्सिन'च्या लशीचेही दुष्पपरिणाम समोर आले आहेत. या लशीचे एका वर्षांनंतर दुष्पपरिणाम दिसले होते. यात तरुणींवर अधिक परिणाम झाल्याचे दिसून आले आहेत.
'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार , कोवॅक्सिन लशीच्या दुष्परिणामावर अभ्यास करण्यात आला. ही लस घेणाऱ्या एक तृतीयांश लोकांमध्ये 'अॅडवर्स इवेंट्स ऑफ स्पेशल इंट्रेस्ट' आजार आढळून आला.
रिपोर्टनुसार, कोवॅक्सिन लस घेणाऱ्या लोकांमध्ये एकावर्षांपर्यंत दुष्परिणाम पाहायला मिळाले. या अभ्यासात १०२४ लोकांना समावेश करण्यात आले होते. त्यात ६३५ किशोरवयीन आणि ३९१ युवा होते. ही लस घेतल्यांतर सर्वांना फॉलोअप चेकअपसाठी बोलावलं जायचं. या अभ्यासात ३०४ किशोरवयीन मुलांना 'व्हायरल अपर रेस्पेरेट्री ट्रॅक इन्फेक्शन्स' झाल्याचे आढळून आले. तसेच १२४ युवांमध्ये अशी स्थिती आढळून आली.
१०.५ टक्के किशोरवयीन मुलांमध्ये 'न्यू-ऑनसेट स्कीन अँड सबकुटॅनियस डिसऑर्डर' दिसून आलं. तर १०.२ टक्के मुलांमध्ये सामान्य डिसऑर्डर दिसला. तर ४.७ टक्के किशोरवयीन मुलांमध्ये नर्वस सिस्टम डिसऑर्डर दिसून आला. तसेच यासारखी स्थिती ८.९ टक्के युवांमध्ये दिसली. ५.८ टक्के मुस्कुलोस्कॅलेटल डिसऑर्डर दिसून आला. तर ५.५ टक्के लोकांमध्ये मज्जासंस्थेशी संबंधित आजार दिसून आले.
कोवॅक्सिनचे अनेक दुष्पपरिणाम तरुणीमध्येही दिसून आले. ४.६ टक्के महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित आजार दिसून आले. तर २.८ टक्के महिलांमध्ये डोळ्याशी संबंधित आजार दिसून आले. ०.६ टक्के महिलांना हायपोथारोइडिज्म झाल्याचे दिसून आले. 0.3 टक्के लोकांमध्ये स्ट्रोकच्या समस्या दिसून आल्या. ०.१ टक्के लोकांमध्ये गुइलेन-बैरे सिंड्रोम आजार दिसून आला. तर वॅक्सिन लस घेणाऱ्या तरुणींमध्ये थायरॉईड सारखे आजार देखील दिसून आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.