Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; 2 जूनला पुन्हा तुरुंगात जावं लागणार

Arvind Kejriwal Latest News : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. जामिनाची मुदतवाढीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने केजरीवाल यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. २ जूनला सरेंडर व्हावे लागणार आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे केजरीवाल यांना २ जूनला पोलिसांपुढे सरेंडर व्हावं लागणार आहे. केजरीवाल यांनी ७ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करणारी याचिकेद्वारे केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली.

सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामिनाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली. सुप्रीम कोर्टने मुख्यमंत्र्यांना ट्रायल कोर्टात याचिका दाखल करण्याची सुट दिली, असं रजिस्ट्रीने म्हटलं आहे. त्यामुळे आता स्पष्ट होत आहे की, केजरीवाल यांना २ जूनला सरेंडर व्हावे लागण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात जामिनामध्ये ७ दिवसांची मुदतवाढ करण्याची याचिका दाखल केली होती. आरोग्याच्या चाचण्या करण्यासाठी केजरीवाल यांनी मुदतवाढीची मागणी केली होती.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिलेले असल्याने ही याचिका सुप्रीम कोर्टात राखता येणार नाही, असं सांगत सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने अर्ज स्वीकारण्यास नकार दिला होता.

दरम्यान, १० मे रोजी अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला. त्यांना १ जूनपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला. न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या पीठाने अंतरिम जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला होता.

दिल्लीतील कथित मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली होती. त्याआधी त्यांना चौकशीसाठी ९ समन्स पाठवण्यात आले होते. केजरीवाल मात्र हजर राहिले नव्हते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री अचानक जाग येते? मनात कसंबसं होतं, भीतीदायक स्वप्ने येतात? मग सावध व्हा! 'ही' असू शकतात कारणे

Cancer symptoms: ही ५ लक्षणं दिसली तर समजा कॅन्सर तुमच्या शरीरात करतोय घर

Maharashtra News Live Update: 6 वर्षीय चिमुकल्यासह आठ जणांना चावा, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

कॉकरोच जनता पार्टीने वाढवलं शिवसेनेचं टेन्शन? पक्षातल्या खासदारांनी मनातलं सांगितलं, बैठकीत काय चर्चा झाली?

पुलासाठी ७ कोटी खर्च केला, ३ वर्षांत तडे गेले; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT