Uttar Pradesh Accident : भयंकर! भाजप नेत्याच्या ताफ्यातील कारने 3 तरुणांना चिरडलं; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू

Karan Bhushan Singh Car Accident : भाजपच्या लोकसभा उमेदवाराच्या ताफ्यातील कारने 3 महाविद्यालयीन तरुणांना चिरडलं. या घटनेत दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Karan Bhushan Singh Car Accident
Karan Bhushan Singh Car AccidentSaam TV
Published On

उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील एका कारने तीन महाविद्यालयीन तरुणांना चिरडलं. यातील दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तिसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात संतापाचं वातावरण आहे.

Karan Bhushan Singh Car Accident
Madhya Pradesh News: एकाच कुटुंबातील ८ जणांची हत्या; तरुणाने आई-बायको आणि इतर नातेवाईकांना संपवलं, नंतर उचललं टोकाचं पाऊल

करण भूषण सिंह हे भाजपचे (BJP) विद्यमान खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांचे पुत्र आहेत. ते कैसरगंज येथून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी करण भूषण सिंह यांचा ताफा जिल्ह्यातील कोतवाली भागातील कर्नलगंज रस्त्यावरून हुजूरपूरकडे जात होता.

बैकुंठ पदवी महाविद्यालयाजवळ ताफा आला असता, तीन महाविद्यालयीन तरुण रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी ताफ्यातील कारने या तरुणांना जबर धडक (Accident) दिली. या धडकेत तरुण गंभीर जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी करण भूषण यांचा ताफा तिथे थांबला नाही.

करण भूषण यांनी स्वतः खाली उतरून मुलांची प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. हा ताफा मुलांना तुडवत गेला आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिकांनी तरुणांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील दोन तरुणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

तिसऱ्या तरुणावर उपचार सुरू असून त्याची देखील प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. सध्या घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली आहे. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले असून रास्ता रोको आंदोलनाची तयारी करीत आहेत.

Karan Bhushan Singh Car Accident
Pune Porsche Case : 'हवे तेवढे पैसे देतो, फक्त...', अपघात होताच आरोपी ओरडला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली सर्व घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com