Madhya Pradesh News: एकाच कुटुंबातील ८ जणांची हत्या; तरुणाने आई-बायको आणि इतर नातेवाईकांना संपवलं, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Madhya Pradesh Crime News: एका युवकाने आपल्या कुटुंबातील 8 जणांची हत्या करून स्वतः फाशी घेत केली आत्महत्या आरोपीने आधी पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला आहे.
Madhya Pradesh Crime News
Madhya Pradesh NewsSaam tv

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका युवकाने आपल्या कुटुंबातील 8 जणांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केलाय. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Madhya Pradesh Crime News
Akola Crime News : घरी सोडण्याच्या बहाण्याने शेतात नेत ७८ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार, अकोल्यातील खळबळजनक घटना

मिळालेल्या मिडिया रिपोर्ट्सनुसार मध्य (Central )प्रदेशामधील छिंदवाडातील महुलझीरमधून २८ मे रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपी हा आपल्या सर्व कुटुंबासह माहुलझीर पोलीस ठाण्यांतर्गत बोदल कचर या गावात वास्तव्यास होता.

मृतांमध्ये आरोपीच्या पत्नी आणि इतर कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. त्यानंतर मामाच्या घरी जात त्याने १० वर्षाच्या मुलीवर हल्ला केला मात्र ती पळून गेल्याने तिचा जीव वाचला आणि संबंधित माहिती परिसरातील व्यक्तींना दिली.

मानसिकरित्या आजारी..

८ जणांनी निघृण हत्या करुन स्वत:हा आत्महत्या केलेला आरोपी हा मानसिकरित्या आजारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीच तपासात आरोपी अमली पदार्थांचे सेवन करत होता का हेही तपासले जात आहे. आरोपी आणि तिच्या पत्नीमध्ये मंगळवार रात्री वाद सुरु असताना ही घटना घडली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले मात्र पोलिसांना आरोपीने हत्या का केली याच कारण अद्याप कळू शकले नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही घटनास्थळी भेट देत निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

२१ मे रोजी झालं होतं लग्न

आरोपीचे लग्न (wedding) २१ मे रोजी झाले होते. त्यानंतर काही दिवसात त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला शिवाय त्यानंतर त्यानेआई (वय ५५ ), बहीण (१६), भाऊ-वहिनी आणि दोन भाची-पुतणे यांची केली हत्या.

Madhya Pradesh Crime News
Sambhajinagar Crime News | संभाजीनगरमध्ये दोन मुलांकडून जन्मदात्या बापाची हत्या, धक्कादायक कारण आले समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com