Munawar Faruqui Wedding : मुनव्वर फारूकीने केलं दुसऱ्यांदा लग्न?,  हिना खानने दिली हिंट; कोण आहे कॉमेडियनची पत्नी?
Bigg Boss 17 Winner Munawar FaruquiSaam Tv

Munawar Faruqui Wedding : मुनव्वर फारूकीने केलं दुसऱ्यांदा लग्न?, हिना खानने दिली हिंट; कोण आहे कॉमेडियनची पत्नी?

Munawar Faruqui 2nd Wedding : बिग बॉस १७ विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकीने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्याची माहिती समोर आली आहे.
Published on

बिग बॉस १७ विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारूकी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तो आजारी असल्याची माहिती समोर आली होती. पण अशातच आता अभिनेत्याने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्याची माहिती समोर आली आहे.

Munawar Faruqui Wedding : मुनव्वर फारूकीने केलं दुसऱ्यांदा लग्न?,  हिना खानने दिली हिंट; कोण आहे कॉमेडियनची पत्नी?
Janhvi Kapoor Reaction : मिचेल स्टार्कने कॅच सोडल्यानंतर जान्हवी कपूरने दिली 'अशी' रिॲक्शन, Video Viral

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, मुनव्वरने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. मुनव्वर १० ते १२ दिवसांपूर्वी लग्न केलेले आहे. त्याने लग्नामध्ये जवळच्या नातेवाईकांना आणि त्याच्या मित्रमंडळींना लग्नाचं आमंत्रण दिले होते. मुनव्वरच्या नातेवाईकांमधील जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने मुंबईतल्या आयटीसी मराठा हॉटेलमध्ये लग्न केले आहे. दुसऱ्या पत्नीचे नाव मेहजबीन कोतवाला असं आहे. जी पेशाने मेकअप आर्टिस्ट आहे. मुनव्वरने लग्नाचा कोणताही फोटो शेअर केलेला नाही, कारण त्याला त्याचे दुसरं लग्न गुप्तच ठेवायचे आहे.

मुनव्वर फारुकीच्या लग्नामध्ये त्याची बेस्ट फ्रेंड आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान सुद्धा लग्नाला उपस्थित होती. हिना आणि मुनव्वर दोघेही खूप चांगले मित्र आहेत. नुकताच त्यांचा एक म्युझिक अल्बम व्हिडीओही रिलीज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हिनाने मुनव्वरच्या लग्नाला हजेरी लावली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, आतापर्यंत मुनव्वरच्या लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेले नाही. मुनव्वर फारुकीचे पहिले लग्न २०१७ मध्ये झाले होते. पण काही वर्षातच त्याचा घटस्फोट झाला. २०२० मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मुनव्वरला त्याच्या पहिल्या बायकोपासून एक मुलगा आहे. त्याचा संभाळ स्वत: मुनव्वर करतो.

Munawar Faruqui Wedding : मुनव्वर फारूकीने केलं दुसऱ्यांदा लग्न?,  हिना खानने दिली हिंट; कोण आहे कॉमेडियनची पत्नी?
Sonu Sood Viral Video : 'मला कॅमेरामन बनायचंय...', सोनू सुदने व्यक्त केली इच्छा व्यक्त; अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com