Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित

Savitribai Phule Pune University: बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांशी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर यांना निलंबित केले आहे.
Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित
saam tv
Published On
Summary
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणात मोठी कारवाई.

  • वित्त व लेखा विभागातील रमेश दामोदर मुखेकर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले.

  • ७० हजार रुपये घेऊन बनावट कागदपत्रे दिल्याची तक्रार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर याने ७० हजार रुपये घेऊन बनावट कागदपत्रे दिल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.

Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित
Pune University: पुणे विद्यापीठात बोगस डिग्री घोटाळा? ३ लाखांत मिळतेय पदवी, काय आहे नेमकं प्रकरण?

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रमेश मुखेकर यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान संबंधित कर्मचारी परीक्षा विभागात कार्यरत नसून कागदपत्रे परीक्षा विभागाच्या अभिलेखांशी सुसंगत नसल्याचे विद्यापीठानं स्पष्टीकरण दिलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बोगस डिग्री देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आलीय.

Pune University: बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी पुणे विद्यापीठाची मोठी कारवाई; रमेश मुखेकर निलंबित
Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

रमेश दामोदर मुखेकर याने व्हॉट्सअॅपवर मूळ कागदपत्रांसारखी भासणारी इमेज पाठवली होती. चतुःशृंगी पोलिस ठाण्यात विद्यापीठाकडून अधिकृत फिर्याद दाखल केली असून मुखेकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस तपासात इतर कोणाचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार आहे.

मुखेकर याने परीक्षा विभागाच्या कामकाजाची माहिती वापरून गैरप्रकार केल्याचा संशय आहे. या प्रकरणानंतर विद्यापीठाकडून गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांमध्ये उच्च दर्जाची सुरक्षा वैशिष्ट्ये असल्याने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आलंय. विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही बनावट कागदपत्रांच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत प्रक्रियेवरच विश्वास ठेवावा, असे विद्यापीठाने स्पष्ट केलंय.

रिक्षा चालक महेश कदम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर या अधिकाऱ्यानं त्याच्या अन्य चार साथीदारासह महेश कदम यांना ३ लाख रुपयांत बी.कॉम डिग्री सर्टिफिकेट देण्याचे कबूल केलं. मुखेकरनं वेगवेगळ्या वर्षांच्या चार डिग्री सर्टिफिकेट दिल्यानं कदम यांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आला आणि बोगस डिग्री विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com