Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल

Pune Crime: पुण्यामध्ये प्रसिद्ध उद्यानातील झाडांची कत्तल करण्यात आली. महापालिका कर्मचाऱ्यानेच हे भयंकर कृत्य केलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल
Pune Crime News Saam Tv
Published On
  • पुणे महापालिका कर्मचाऱ्याचा कारनामा

  • पू ल देशपांडे उद्यानातील झाडांची चोरी

  • पुण्यात झाडांची लाकडं चोरल्याचा व्हिडीओ व्हायरल

  • पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध उद्यानातील झाडांवर पालिका कर्मचाऱ्याने कुऱ्हाड फिरवली. तोडलेल्या झाडांची लाकडं ट्रकमध्ये भरून घेऊन जात असल्याचा संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना समोर येताच पुण्यात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. याबाबत पुणेकरांनी संताप व्यक्त करत आहे.

पुण्यातील पू. ल. देशपांडे उद्यानात झाडांची त्याने कत्तल केली. हा कर्मचारी झाडं तोडून लाकडं वखारीत नेऊन ठेवत असताना प्रकार उघडकीस आला. पुण्यातील प्रसिद्ध उद्यानात घडलेल्या प्रकारामुळे पुणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात महापालिकेच्या कर्मचारी आणि इतर ४ जणांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकाराबाबत तन्मय बाबर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार २८ जुलै रात्री ९.३० वाजता सिंहगड रोड परिसरातील पू. ल. देशपांडे उद्यानात घडला. तुकाराम कुंडगीर, विकास आटोळे यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल
Pune : पुणेकरांची चिंता मिटली! पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांतील जलसाठा ९१.४७ टक्क्यांवर, खडकवासला धरण शंभर टक्के भरले

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तन्मय बाबर हे त्यांच्या सहकाऱ्यासोबत खडकवासला येथून महर्षीनगर येथे असलेल्या घराकडे निघाले होते. रस्त्यात त्यांनी सिंहगड रोड वरील पू. ल. देशपांडे उद्यानाच्या आतमध्ये एक टेम्पोमध्ये झाडांची तोडलेली लाकडे भरताना ३ व्यक्ती दिसले. तिथून असलेल्या काही अंतरावर टेम्पो जात असताना फिर्यादी यांनी त्या टेम्पो चालकाला थांबवून "संबंधित झाडं तू कुठून आणलीस" असे विचारले असता त्याने ते एका सोसायटी मधून आणल्याचं सांगितलं. मात्र जेव्हा फिर्यादी यांनी ते झाडांची लाकडं देशपांडे उद्यानातील आहेत ना असं विचारलं असता टेम्पोमधील सर्वांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल
Pune University: पुणे विद्यापीठात बोगस डिग्री घोटाळा? 3 लाखांत B.Comच्या डिग्रीची विक्री?

तन्मय बाबर यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी टेम्पोतील त्या तिघांना विचारले असता लाकडे पू .ल. देशपांडे उद्यानातून चोरून आणल्याचे सांगितले. कुंडगीरने सिंहगड रोड येथील उद्यान मिस्त्री विकास नानासाहेब आटोळे यांच्या आदेशावरुन झाडं तोडून गाडीत भरुन कोंढव्यातील वखारीत घेऊन जात असल्याचे सांगितले.

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल
Pune Dogs: पुणे पालिकेचा गजब कारभार! भटक्या कुत्र्यांची होणार गणना; 25 लाखांचा खर्च करणार

कुंडगीरने आटोळे यांचे नाव घेतल्याने फिर्यादी यांनी त्या ठिकाणाहून त्यांना फोन केला. फिर्यादी यांनी आटोळे यांना देशपांडे उद्यानातील झाडं तुमच्या आदेशावरून तोडून ते वखारीत नेत आहेत याबद्दल प्रश्न विचारले असता त्यांनी नाही असं उत्तरं दिले. तसेच कुंडगीरला परवानगी दिली नसल्याचं आटोळे यांनी सांगितलं. तसेच कुंडगीरला "मीच झाडं तोडायला लावले" असल्याचे सुद्धा आटोळे यांनी कबुल केले. या प्रकरणावरून आता पर्वती पोलिसांनी कुंडगीर, आटोळे यांच्यासह इतर तीन जणांवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) म्हणजे चोरी आणि कलम ३२४(३) म्हणजे मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: उद्यानातील झाडांवर फिरवली कुऱ्हाड, पालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; लाकडं घेऊन जातानाचा VIDEO व्हायरल
Pune : पुण्यातील पेठाही आता FDA च्या रडारावर, अनेक मिठाईच्या दुकानावर छापा; ५ हॉटेलचे परवाने रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com