Pune : पुण्यातील १० हजार डॉक्टर संपावर जाणार, रुग्णसेवा कोलमडणार, नेमकं कारण काय?

Pune Doctor Strike Update News : डोंबिवली महापालिका रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील सुमारे 10 हजार डॉक्टरांनी 20 ते 21 जुलैदरम्यान 24 तासांच्या संपाची हाक दिली आहे.
Pune 10000 Doctor On Strike Over Dombivli Hospital Doctor Attack
Pune 10000 Doctor On Strike Over Dombivli Hospital Doctor Attack Saam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील सुमारे 10 हजार डॉक्टरांचा 24 तासांचा संप

  • डोंबिवलीतील आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ करणार संप

  • संप 20 जुलै सकाळी 6 वाजल्यापासून 21 जुलै सकाळी 6 वाजेपर्यंत चालणार

  • आपत्कालीन सेवा, ICU आणि अत्यावश्यक उपचार सुरू राहणार

डोंबिवली येथील महापालिका रुग्णालयात डॉक्टर,नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील सुमारे दहा हजार डॉक्टरांनी संपाची हाक दिली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया यांच्या पुणे शाखेच्या नेतृत्वाखाली हा संप २० जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होऊन २१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे. या संपामुळे जिल्ह्यातील अनेक खाजगी रुग्णालयांमधील नियमित वैद्यकीय सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. मात्र, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग आणि अत्यावश्यक उपचार सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर संघटनांकडून देण्यात आली आहे.

डॉक्टर संघटनांनी सांगितले की, आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वाढत्या हिंसाचाराच्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. संपाच्या माध्यमातून डॉक्टर संघटनांनी काही महत्त्वाच्या मागण्या पुढे केल्या आहेत.

Pune 10000 Doctor On Strike Over Dombivli Hospital Doctor Attack
Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

डोंबिवलीतील घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, महाराष्ट्र मेडिकेअर संरक्षण कायदा अधिक प्रभावी आणि कडक करण्यात यावा, तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था बंधनकारक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Pune 10000 Doctor On Strike Over Dombivli Hospital Doctor Attack
Skin Care : चेहऱ्यावर एकाच जागी वारंवार पिंपल येतोय? यामागे असू शकते 'हे' गंभीर कारण; वेळीच व्हा सावध

याशिवाय डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचाराविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण लागू करून सुरक्षित आणि निर्भय वातावरणात काम करण्याची हमी सरकारने द्यावी, अशीही मागणी संघटनांनी केली आहे. या संपामुळे नियमित आरोग्य सेवांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यकतेनुसार वैद्यकीय नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com