Twist Again in Surat Lok Sabha Constituency, As Petition Register In Supreme Court To Consider NOTA as a Candidate Saam TV
देश विदेश

Surat Lok Sabha Election 2024: सूरत लोकसभा मतदारसंघात पुन्हा ट्विस्ट; NOTAला उमेदवार माना, सुप्रीम कोर्टात याचिका

Gujrat Lok Sabha Electon 2024: आता या लोकसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. या लोकसभा मतदारसंघातील बिनविरोध प्रकरणी NOTAला उमेदवार म्हणून विचार करण्याची मागणी याचिकेत केली आहे.

Pramod Subhash Jagtap

सूरत : गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला. तर इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर भाजपच्या उमेदवार मुकेश दलाल यांनी विजयाचा गुलाल उधळला. मात्र, आता या लोकसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. या लोकसभा मतदारसंघातील बिनविरोध प्रकरणी NOTAला उमेदवार म्हणून विचार करण्याची मागणी याचिकेत केली आहे.

गुजरातमधील सूरत निवडणुकीतील भाजप उमेदवाराचा विजय अडचणीत ठरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सूरत लोकसभा निवडणूक बिनविरोध प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुरतमध्ये निवडणूक बिनविरोध जिंकण्याची परिस्थिती टाळण्यासाठी NOTAचा उमेदवार म्हणून विचार करण्याची याचिकेत मागणी केली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे.

NOTAला उमेदवार मानले जावे आणि NOTA ला विजयी उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली तर तिथे पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी जनहित याचिका शिवखेडा यांनी कोर्टात दाखल केली आहे. या प्रकरणावर लवकरच सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

तत्पुर्वी, ही याचिका फक्त सूरत बद्दल नाही. तर देशभरातील 'नोटा'च्या मतदानाबाबत आहे. मात्र, याचिका दाखल करताना सूरतच्या प्रकरणाचा दाखला देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT