Maval Lok Sabha : मावळ लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज

Maval News : मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे
Maval Lok Sabha
Maval Lok SabhaSaam tv

दिलीप कांबळे
मावळ
: मावळ लोकसभा मतदार संघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. आजच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे (Maval) मावळ लोकसभा मतदार संघात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Breaking Marathi News)

Maval Lok Sabha
Panvel News : निवडणूक भरारी पथकाकडून ३६ लाखाची रोकड जप्त; पनवेल परिसरात वाहन तपासणीत कारवाई

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला होत आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. यात मावळचा समावेश असून मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. शेवटच्या दिवशी मावळ लोकसभा मतदार संघातुन वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) कडून माधवी जोशी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Maval Lok Sabha
Dhule Accident : दुचाकीला कारची मागून धडक; अपघातात भावा-बहिणीचा मृत्यू

वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने आता मावळ लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे मावळमध्ये तिरंगी लढत होऊ शकते. वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार असल्यामुळे आता मत विभागली जाणार असून याचा फटका कोणत्या शिवसेनेला बसणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com