Dhule Accident : दुचाकीला कारची मागून धडक; अपघातात भावा-बहिणीचा मृत्यू

Dhule News : काही अंतरावर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेनंतर कारच्या काचा फोडून कारमधील फरार झाले.
Dhule Accident
Dhule AccidentSaam tv

पिंपळनेर (धुळे) : निजामपूर ते वासखेडी मार्गावर खडकी नाल्याजवळ कार आणि दुचाकीत भीषण अपघात झाला. या (Accident) अपघातात चुलत भावा-बहिणीचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारमध्ये बसलेल्यानी कारच्या काचा (Dhule) फोडून तेथून पलायन केले. या अपघाताने संतप्त नातेवाइकांसह ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. (Maharashtra News)

Dhule Accident
Lightning Strike : अंगावर वीज पडल्याने बालकाचा मृत्यू; बैलांना धरणावर नेले असतानाची घटना

साक्री (Sakri) तालुक्यातील वासखेडी शिवारातील खडकी नाल्याजवळ २२ एप्रिलला दुचाकीने तुषार दादाजी नेरकर (वय ३०) व चुलत बहीण संगीता अनिल सूर्यवंशी (वय ४२, रा. वासखेडी) हे वासखेडीकडे जात होते. या दरम्यान त्यांना मागून कारने जोरात धडक दिली. या घटनेत नेरकर व सूर्यवंशी या काही अंतरावर फेकल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. या भीषण घटनेनंतर कारच्या काचा फोडून कारमधील फरार झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Dhule Accident
Panvel News : निवडणूक भरारी पथकाकडून ३६ लाखाची रोकड जप्त; पनवेल परिसरात वाहन तपासणीत कारवाई

घटनेची माहिती मिळताच संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. त्या ठिकाणी निजामपूरचे पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले. आक्रमक जमावाने कार चालकास अटक होत नाही; तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत सात तास आंदोलन केले. दरम्यान आरोपीस लवकर ताब्यात घेऊन कारवाईचे आश्वासन श्री. काळे यांनी दिल्यावर संतप्त नातेवाइकांनी सात तासांनंतर मृतदेह ताब्यात घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com