Panvel News : निवडणूक भरारी पथकाकडून ३६ लाखाची रोकड जप्त; पनवेल परिसरात वाहन तपासणीत कारवाई

Panvel News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता असल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे
Panvel News
Panvel NewsSaam tv

सिद्धेश म्हात्रे

पनवेल : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाहन तपासणी जोरात करण्यात आली आहे. या वाहन तपासणीच्या मोहिमेत (Panvel) पनवेल परिसरात निवडणूक भरारी पथकाने दोन दिवसात ३६ लाखाची रोकड जप्त केली आहे. (Police) पोलिसांकडून रक्कमेबाबत तपास करण्यात येत आहे. (Tajya Batmya)

Panvel News
Kalyan News : देशभरात शंभरहून अधिक गुन्हे, सहा राज्यातील पोलीस मागावर असलेला चोरटा कल्याण पोलिसांच्या ताब्यात

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election) अनुषंगाने राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहिता असल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे. मुख्य म्हणजे आचारसंहितेच्या नियमानुसार या कालावधीत ५० हजार रुपये रोख रकमेपेक्षा जास्त रक्कम नेता येत नाही. जास्तीची रक्कम बाळगल्यास कारवाई करण्यात येते. या नियमानुसार (Maval) मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पनवेल विधानसभा मतदार संघात स्थिर सर्व्हेक्षण पथकाची नेमणूक करण्यात आलेय. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Panvel News
Lightning Strike : अंगावर वीज पडल्याने बालकाचा मृत्यू; बैलांना धरणावर नेले असतानाची घटना

सर्व्हेक्षण भरारी पथकांनी दोन दिवसात पनवेल परिसरातून वाहन तपासणी दरम्यान ३५ लाख ९९ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. पथकाद्वारे या रकमेची अधिक चौकशी केली असता ही रक्कम खाजगी असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे समोर आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com