BRS Leader K kavitha 
देश विदेश

Delhi Liquor Scam Case: सिसोदिया यांच्यानंतर के कविता यांना जामीन; दारू घोटाळा प्रकरणात ED-CBI ला सुप्रीम कोर्टाचा दणका

BRS Leader K kavitha: दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (BRS) नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळालाय.

Bharat Jadhav

दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्यात सुप्रीम कोर्टाने ईडी आणि सीबीआयला दणका दिलाय. दारू घोटाळ्यात आरोपी ठरवण्यात आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलाय. कोर्टाने १० लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन देत सर्वोच्च न्यायालयाने काही अटीही घातल्या आहेत. के कविता यांना त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. तसेच या प्रकरणाचा तपास चालू असल्याने पुरव्यांमध्ये कोणत्याच प्रकारची छेडछाड करू नये, अशी सक्त ताकीद सुद्धा न्यायालयाने दिलीय. नुकताच सर्वोच्च न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना १८ महिन्यानंतर जामीन दिला होता.

न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने के कविता यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. जामीन मंजूर करताना खंडपीठाने म्हटलं की, मेरिटवर कोणतीची टिप्पणी केली नाही, जेणेकरून खटल्यावर कोणताही परिणाम होणार नाही. दारू घोटाळ्याप्रकरणात के कविता ५ महिन्यापासून तुरुंगात बंद होत्या.

या घोटाळ्यात भारत राष्ट्र सिमितीच्या नेत्या के कविता यांचीही मोठी भूमिका होती, असा आरोप ईडीने केला होता. तुरुंगात असलेल्या कविता यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला होता. बीआरएस नेत्या के कविता यांनी मोबाईल फोन फॉर्मेट केला होता. त्यांनी पुराव्यासोबत छेडछाड केल्याचा दावा ईडीने जामीनाला विरोध करताना केला होता. या आरोपावर बोलतांना कविता म्हणाल्या की, मोबाईल फॉर्मेट करण्याचा आरोप बिन बुडाचा आहे. तसेच तपास यंत्रणेकडे के कविता ह्या घोटाळ्यात सहभागी होत्या याचा काय पुरावा आहे , अशी विचारणा कोर्टाने केलेी होती.

ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी कविता यांची बाजू कोर्टात मांडली. युक्ती वादवाद करतांना ते म्हणाले, आपल्या अशिलाविरुद्ध दोन्ही एजन्सींचा तपास पूर्ण झाला असल्याचे सांगत जामिनासाठी विनंती केली. दोन्ही प्रकरणांमध्ये सहआरोपी आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांना जामीन देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही त्यांनी उल्लेख केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

Kalakand Recipe: मुलांसाठी घरच्या घरी मलाईदार गुलकंद कलाकंद बनवायचं आहे का? वाचा सोप्या टिप्स

Kidney Health: आजच '१' पांढरा पदार्थ खाणं बंद करा; किडनी फेलचा धोका वाढतो.. तज्ज्ञ सांगतात...

Dhaba Style Chiken Curry: ढाबा स्टाईल चिकन करी घरी बनवण्याची सोपी पद्धत

Shegaon Crime : आठवडे बाजाराच्या गर्दीत गाठत युवकाची हत्या; खळबळजनक घटनेने शेगाव हादरले

SCROLL FOR NEXT