Passenger Heart Attack In Delhi Airport: गेल्या काही दिवसांपासून हार्ट अटॅकच्या घटनेत वाढ होत आहे. चालत्या-फिरत्या लोकांना हार्ट अटॅक येत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. या घटनेत अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झालेत. दिल्ली विमानतळावरील अशीच एक घटना व्हायरल झाली आहे. एक तरुण दिल्ली विमानतळावर मोबाईल पाहात थांबला होता, त्याचवेळी अचानक कोसळला. त्याला cardiac arrest आल्याचे वृत्त आहे. त्या तरुणाचा जीव सीआयएसएफ जवानाने वाचवला. याप्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दिल्ली विमानतळात एक प्रवासी ट्रॉलीमध्ये आपले सामान घेऊन जात होता. तो एका ठिकाणी थांबून मोबाईल बघत होता. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो कोसळला. त्याचे शरीर थरथरू लागले आणि बेशुद्ध झाला. हे पाहताच शेजारीच असणारे सीआयएसएफ जवान धावत आले. त्यामधील एका जवानाने प्रवाशाला शुद्धीवर आणण्यासाठी कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) दिले.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तरुण विमानतळावरच कोसळला. त्यावेळी सीआयएसएफ जवान धावत आले. त्यामधील एकाने सीपीआर दिला. तर इतर जवानांनी त्याचे हात-पाय घासले. त्यामुळे तरुणाचा जीव वाचला. ही घटवा घडल्यानंतर प्रवाशांनी गर्दी केली. यासंबंधीचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.
या घटनेबाबत सीआयएसएफने प्रसारमाध्यमांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही घटना 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10.50 वाजता दिल्ली विमानतळावर घडली. अर्शीद आयुब नावाचा तरुण दिल्लीहून श्रीनगरला निघाला होता. त्या तरुणाला विमानतळावर अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने कोसळला. जवानांनी तातडीने सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवले. सध्या तो तरुण दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.