Gyanvapi Mosque Case Hearing In Supreme Court Saam Tv
देश विदेश

Gyanvapi Mosque Case: 'ज्ञानवापी' प्रकरणी आदेश करु नये; SC ची वाराणसी न्यायालयास सूचना

ज्ञानवापी मशिद प्रकरणी आज सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी झाली.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली (Gyanvapi Mosque Case) : वाराणसी दिवाणी न्यायालयासमोर फिर्यादींच्या वतीने करण्यात आलेल्या विनंतीवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (गुरुवार) ज्ञानवापी मशीद प्रकरणातील (Gyanvapi Mosque Case) सुनावणी उद्यापर्यंत (शुक्रवार) तहकूब (Gyanvapi Mosque Case Supreme Court Latest Update) केली. न्यायालयाने (court) वाराणसी दिवाणी न्यायालयाला या प्रकरणात आज कोणताही आदेश देऊ नये असे निर्देश दिले आहेत. (Gyanvapi Mosque Case Latest Marathi News)

याबाबत वकील विष्णू शंकर जैन (Vishnu Shankar Jain) यांनी दिवाणी न्यायालयात फिर्यादींचे प्रतिनिधित्व करणारे वकील हरी शंकर जैन (Hari Shankar Jain) यांना कालच रुग्णालयातून उपचारानंतर घरी साेडण्यात आले आहे त्यामुळे उद्यापर्यंत स्थगिती देण्याची विनंती न्यायालयास केली.

दरम्यान मस्जिद समितीतर्फे ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी ((Huzefa Ahmadi)) यांनी सादर केले की, ट्रायल कोर्ट (वाराणसी दिवाणी न्यायालय) आज मशिदीच्या वजुखानाची भिंत बदलण्याची मागणी करणाऱ्या अर्जांवर सुनावणी करत आहे आणि सुनावणी पुढे ढकलत असल्यास कार्यवाही स्थगित करावी अशी विनंती न्यायालयास केली.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जैन यांनी या प्रकरणी उद्या सुनावणी घेतली जाईल असे स्पष्ट केले. तसेच आज न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, सूर्यकांत आणि पीएस नरमसिम्हा यांच्या खंडपीठाने वाराणसी न्यायालयाने दिलेल्या सर्वेक्षणाला आव्हान देणाऱ्या मस्जिद समितीने दाखल केलेल्या याचिकेवर आदेश देताना वाराणसी दिवाणी न्यायालयाला या प्रकरणात आज कोणताही आदेश देऊ नये असे निर्देश दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT