Gyanvapi Mosque: १००० फोटो, काही तासांचे व्हिडिओ; १२ पानी अहवाल सादर

Gyanvapi Mosque Survey Report: या अहवालात १ हजारहून अधिक फोटो तर काही तासांचे व्हिडिओ आहेत.
Gyanvapi Mosque Survey Report
Gyanvapi Mosque Survey ReportSaam Tv
Published On

वाराणसी : वाराणसीतील ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Mosque) प्रकरणी न्यायालयाचे विशेष आयुक्त विशाल सिंह यांनी आज आपला पाहणी अहवाल सादर केला आहे. १२ पानांचा हा अहवाल १४ ते १६ मे दरम्यान केलेल्या सर्वेक्षणाचा आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग रवी कुमार दिवाकर यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला आहे.

१२ पानांचा हा अहवाल आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या अहवालात नेमक काय आहे. याची माहिती अजुनही दिलेली नाही. (Gyanvapi Mosque Survey Report)

Gyanvapi Mosque Survey Report
औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी 5 दिवस बंद, पुरातत्व विभागाचा निर्णय

'आम्ही रात्रभर जागे राहून अहवाल तयार केला. अहवाल तयार करताना सर्व बाबींची काळजी घेण्यात आली आहे. १ हजारहून अधिक फोटो, अनेक तासांचे व्हिडिओ फुटेज आहेत, असं सहायक अधिवक्ता आयुक्त अजय प्रताप सिंह म्हणाले. अजय मिश्रा यांनी सादर केलेल्या अहवालातील मुद्यांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे अजय प्रताप सिंह यांनी सांगितले.

अजय प्रताप सिंह यांनी आयुक्त अजय मिश्रा यांना हटवल्याबद्दल दु:ख व्यक्त केले, आणि ते बेपत्ता असल्याचे सांगितले. अजय प्रताप सिंह म्हणाले की, आम्ही आज अहवाल सादर करू, त्यानंतर न्यायालय त्यावर लक्ष देईल आणि त्यानंतर जो काही आदेश देईल, आम्ही त्याचे पालन करू. मात्र, त्यांनी या अहवालावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.(Gyanvapi Mosque Survey Report)

यापूर्वी न्यायालयाचे आयुक्त असलेले अजय कुमार मिश्रा यांनी ६ आणि ७ मे रोजी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल वाराणसी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागीय रवी कुमार दिवाकर यांच्या न्यायालयात सादर केला आहे. विवादित जागेच्या मूळ बॅरिकेडिंगच्या बाहेर उत्तरेपासून पश्चिमेकडील भिंतीपर्यंत कोपऱ्यावर जुन्या मंदिरांचे ढिगारे आहेत, असं या अहवालात म्हटले आहे.

Gyanvapi Mosque Survey Report
हृदयद्रावक! कौटुंबिक वाद विकोपाला; पती-पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

अजय कुमार मिश्रा यांच्या अहवालानुसार, देव-देवतांच्या कलाकृती आणि इतर कमळ कलाकृती ढिगाऱ्यावर दिसल्या, उत्तरेकडून पश्चिमेकडे जाताना मध्यवर्ती खडकावर शेषनागाची सापासारखी आकृती दिसली.

अजय कुमार मिश्रा यांच्या अहवालानुसार, ज्ञानवापीमध्ये, रॉकबोर्डवर नक्षीदार सिंदूर रंगीत कलाकृती दिसली, ज्याची व्हिडिओग्राफी करण्यात आली. दगडी पाटावरील देव ज्यामध्ये चार मूर्तींचा आकार दिसतो, असंही या अहवालात म्हटले आहे.(Gyanvapi Mosque Survey Report)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com