महाबळेश्वर : शासनाच्या (maharashtra government) माध्यमातून सातारा (satara) जिल्ह्यातील (mahableshwar) येथे मधुसागर (madhusagar) सारखी उभारलेली संस्था मोडीत काढण्याचे काम आता शासनाच करु लागले आहे. ज्या संस्थेला जगवले पाहिजे त्याऐवजी शेतकऱ्यांचा (farmers) मध घेऊन संस्था अडचणीत आणण्याचे काम खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून केला जात असल्याची खंत मधुसागारचे चेअरमन संजय गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. (manghar latest marathi news)
महाबळेश्र्वर मधील मांघर (manghar) हे गाव म्हणून देशातील पाहिले मधाचे गाव (village of honey) म्हणून नुकतेच जाहीर झाले आहे. त्यामुळे हे गाव आता प्रकाशझाेतात आले आहे. खादी ग्राम उद्योगच्या माध्यमातून ही संकल्पना शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आली आहे परंतु आता या सगळ्यामध्ये नवीनच वादाचा मुद्दा समोर आला आहे. सन १९५५ पासून मधुसागर या संस्थेच्या माध्यमातून महाबळेश्वर व आजूबाजूच्या परिसरातून गावकऱ्यांनी साठवलेला मध घेतला जातो आणि त्यांना योग्य तो मोबदला देऊन तो थेट लोकांच्या पर्यंत पोहचवला जातो. त्यामुळे ग्राहकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये या संस्थेबद्दल एक विश्वास आहे परंतु आता खादी ग्राम उद्योगने स्वतःच हा मध संकलित करण्याचे काम सुरू केल्याने शासनच शासनाच्या संस्थेला पर्यायी संस्था उभी करून जुनी संस्था मोडीत काढत असल्याची खंत मधूसागर या संस्थेचे चेअरमन संजय गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
संजय गायकवाड म्हणाले खरं तर खादी ग्राम उद्योगने मधाच्या गावाची जी संकलपना मांडली त्याबाबत मधुसागर संस्थेला सोबत घ्यायला हवे होते. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी शासनाने खादी ग्राम उद्योगला पुढे आणले. शेतकऱ्याला प्रशिक्षण देणे, रोगराई पासून बचाव करणे ही कामे खादी ग्राम उद्योगची आहेत पण सध्या शेतकऱ्यांचा चांगल्या प्रतीचा मध घ्यायचा आणि त्याचे दुकान मांडायचे हा प्रकार सुरू आहे. शासनाने ज्या संस्थेला जगवले पाहिजे त्याऐवजी शेतकऱ्यांचा मध घेऊन ही संस्था अडचणीत आणण्याचे काम खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून होऊ नये अशी अपेक्षा आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.